दुष्काळात तेरावा…गांजपूरची लाईटच तोडली..
प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी :-
पेरणी करून होतं नव्हतं त्याने काळ्या आईची ओटी भरली.पिके ही चांगली आली परंतू महीनाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे हातचा घास जात आसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.अधिकाऱ्यांच्या विसंगत कार्यपध्दतीमुळे पीक विमा अग्रीमापासून वंचीत राहतो की काय अशी भिती धारूर तालुक्यांत निर्माण झालेली असतानाच गांजपूर गावकऱ्यांवर नवीनच संकट ओढावले आहे.
गांजपूर साठी कुंबेफळ ता.केज येथून वीज पुरवठा आहे.मागील कांही दिवसापासून वीज पुरवठा सुरळीत नव्हता.तो दुरूस्त करण्याचे लांबच राहून गांजपूर ला येणाऱ्या वीजेच्या तारा जानेगाव जवळ उप कार्यकारी अभियंता शहाणे व कांही लोकांनी अनाधिकृतपणे तोडल्या आहेत.
या मुळे गांजपूरकरांवर दुष्काळात तेरावा महीना अशी परिस्थिती निर्माण झालेला आहे.
तरी सदरील वीज पुरवठा तात्काळ पुर्ववत करा.अनाधिकृत पणे वीज तोडणारांवर गुन्हा दाखल करा आन्यथा दि.२/९/२०२३ रोजी सकाळी ११ :०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक किल्ले धारूर येथे रस्ता रोको आंदोलन केले जाईल असा ईशारा गांजपूर गावकऱ्यांच्या वतीने प्रा.ईश्वर मुंडे, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी तसेच महाराष्ट्र राज्य किसान सभा तालुका कमिटी धारूर यांच्या वतीने काशीराम सिरसट,दादासाहेब सिरसट व ईतरांनी कार्यकारी अभियंता,अंबाजोगाई,उप कार्यकारी अभियंता,घारूर व केज तसेच उप अभियंता होळ,तहसिलदार,धारूर व पोलीस स्टेशन धारूर तसेच युसुफ वडगाव यांना निवेदनाद्वारे दिला आहे.


