अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील व माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्या आदेशाने तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अहमदनगर शहर अध्यक्षपदी नियुक्ती करून,नियुक्तीचे पत्र देण्यात आले यावेळी माझी महापौर अभिषेक कळमकर, अमित गांधी, दीपक गुगळे, शहानवाज शेख, स्वप्नील गायकवाड आदी उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते तसेच जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांना मागील तीन वर्षांपूर्वी त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अहमदनगर जिल्हा सरचिटणीस पदी निवड केली होती. त्यानंतरही त्यांनी पक्षाच्या विविध कामात सक्रिय सहभाग नोंदविला होता. तसेच प्रकाश पोटे मागील सहा ते सात वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असून जनसामान्यांना न्याय देण्यासाठी आजवर त्यांनी अनेक आंदोलने उपोषणे केलेली आहे. त्याचीच दखल घेत त्यांना अहमदनगर शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी सत्काराला उत्तर देत प्रकाश पोटे म्हणाले की पक्षाने जी जबाबदारी दिली आहे त्याला तडा न जाऊ देता सामाजिक भावनेने कार्य करणार असून,युवकांचे, गोरगरीब जनतेचे व निराधारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटीबद्ध राहुन शहरात व जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढवण्यासाठी कार्य करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली..

