shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रभाकर पाटील सांस्कृतिक कला मंचातर्फे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मिनाक्षीताई पाटील यांचा सत्कार


प्रतिनिधी : राजेश बाष्टे


 अलिबाग : १५ /  महाराष्ट्र राज्य सरकारच्या माजी मंत्री तसेच रायगड जिल्ह्याच्या एकेकाळी  विधानसभा गाजविणाऱ्या  रणरागिणी यांना अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मिनाक्षीताई पाटील यांना वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभाकर पाटील सांस्कृतिक कला मंचातर्फे मंचाचे अध्यक्ष सखाराम आण्णा पवार , रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तसेच प्रभाकर पाटील सांस्कृतिक कला मंचाचे कार्यवाह नागेश कुलकर्णी, मंचाचे सल्लागार तसेच भाल जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीरंग घरत,अलिबाग जेष्ठ नागरिक संघाच्या उपाध्यक्षा चारुशीला कोरडे, जेष्ठ साहित्यिक शरदजी कोरडे, नाट्य कर्मी जगदीश नागे,कोमसापचे सहकार्यवाह नंदु तळकर, सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल भालचंद्र वर्तक, साहित्यिक राजाराम भगत,अँड. राजेंद्र जैन, हेमकांत सोनार आदींच्या उपस्थितीत मिनाक्षीताईना मानपत्र ,शाल,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

     यावेळी मंचातर्फे ताईंना वाढदिवसाच्या निमित्ताने पुढील आयुष्य आनंदी तसेच आरोग्यमय जावो यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
close