रणसिंग महाविद्यालयात नव मतदार नोंदणी अभियान उपक्रम
फोटो ओळ - कळंब ता इंदापूर येथे नवमतदार नोंदणी अभियान प्रसंगी उपस्थित मान्यवर व विद्यार्थी.
इंदापूर प्रतिनिधी: कळंब ता. इंदापूर येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ ,राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने नव मतदार नोंदणीअभियान राबविण्यात आला. या कार्यक्रमासाठी इंदापूर तालुक्यातील महसूल विभागाचे अंथुर्णे मंडल अधिकारी विजय ढवाण,तलाठी महादेव खारतोडे ,कोतवाल गणेश सुतार ,बुथ लेवल अधिकारी बापूराव अर्जुन ,पोपट पाटोळे, महेश कल्याणकर यांच्या उपस्थित घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.ज्योत्स्ना गायकवाड विद्यार्थ्यांना मतदान यादीत नाव नोंदवण्यासाठी आव्हान केले.मंडळ अधिकारी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून मतदार यादी मध्ये नाव नोंदणीसाठी लागणाऱ्या कागदपत्रा विषयी माहिती दिली.तसेच जास्तीत जास्त नवनवीन मतदार नोंदवले गेले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंकुश आहेर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मतदार यादीत नाव नोंदणी करावी.लोकशाही प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी फॉर्म वाटप करून सर्व कागदपत्रासह महाविद्यालयात जमा करण्यासाठी सांगण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थी कल्याण अधिकारी राजेंद्रकुमार डांगे,प्रा अभिजीत शिंगाडे ,कपिल कांबळे,विनायक शिंदे ,नोडल अधिकारी बाळासाहेब कवळे इ मान्यवर व महाविद्यालयातील प्रथम वर्षातील विद्यार्थी उपस्थित होते.

