shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पोळा सणावर दुष्काळाचे सावटसर्जा राजांची शेतकऱ्यांकडून हौस मौज पूर्ण...!


न्याहळोद :  अत्यंत कमी पावसामुळे पिके करपली आहेत . फारसे उत्पन्न येणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने दुष्काळ पडलाच असला तरी शेतकऱ्यांनी बैलांची सजावट पूर्ण केली  होती . लम्पि रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पोळा फोडणे , शर्यत लावणे या पारंपरिक पद्धतीस फाटा देत सण साजरा करण्यात आला. 
न्याहळोद  परिसरात अनेक गुरांना लम्पि आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे.  पशुवैद्यकीय अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सुमारे ९० टक्के गुरांचे लसीकरण पूर्ण केले आहे . आजही पोळा निमित्त साधून त्यांनी अनेक गुरांचे लसीकरण पूर्ण केले.

गुरांना संसर्गजन्य रोग होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी काळजी घेणे बाबत पत्रक काढले होते . या अनुषंगाने येथील माजी उपसरपंच देविदास जिरे यांनी आपल्या सर्जा राजांना सजवून साध्या पद्धतीने पोळा साजरा केला.
  
     तसेच दुष्काळ मुळे हाती काहीही येणार नसल्याचे दिसून आले असतांना शेतकऱ्यांनी बैलांची सजावट आनंदाने केली .
close