shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निमसाखर येथे जालना जिल्ह्यात लाठी चार्ज केल्याच्या निषेधार्थ गाव बंद ठेवत , काही वेळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

निमसाखर येथे  जालना जिल्ह्यात लाठी चार्ज केल्याच्या  निषेधार्थ गाव बंद ठेवत ,  काही वेळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
 
इंदापूर प्रतिनिधी : इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे(दि. ३ सप्टे ) जालना जिल्ह्यात झालेल्या प्रकाराबद्दल निषेधार्थ गाव बंद ठेवत ,  काही वेळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्याप्रमाणावर मराठा बांधव उपस्थित राहत त्या अंदोलना दरम्यान अमानुष लाठी चार्ज केल्याच्या निषेध व्यक्त करत सखोल चौकशी, दोशींवर कडक कारवाई करावी सह अन्य मागण्या चे निवेदन अंदोलकांनी यावेळी दिले. 
           कळंब - बावडा या राज्य मार्गावरील निमसाखर येथे सकाळी ९ वाजता सुरुवातीला गावातील सर्व व्यावसायीक दुकाने बंद ठेवण्यात आले. यानंतर निमसाखर येथील मुख्य चौकात सर्व मराठा समाज एकत्र येत रास्ता रोको करण्यात आला.काही वेळ रोको सुरु असताना घोषणा देण्यात आल्या.दरम्यान उपस्थित हर्षल रणवरे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांना निषेध व्यक्त करणारे निवेदन देण्यात आले. या वेळी छत्रपती साखर कारखान्याचे संचालक अभिजीत रणवरे , सरपंच धैर्यशील रणवरे , माजी तंटामुक्त अध्यक्ष काका पाटील , मानसिंग रणवरे , तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष पाटील , धनंजय रणवरे , सुनील रणवरे ,गजानन रणवरे , संतोष रणवरे , मच्छिंद्र डुबल, ज्ञानदेव माने, अतुल रणवरे,सचिन रणवरे  ,सागर रणवरे ,सुदर्शन रणवरे, मंगेश रणवरे, नदुकुमार रणवरे,रणजीत  रणवरे    , पंढरीनाथ धनवडे, पांडुरंग रणवरे,शिवराज रणवरे,  ,सुनील रणवरे    ,गजानन. रणवरे    , उमेश रणवरे यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. 
 ---------------------
चौकट
 
      यावेळी सामाजिक कार्यकर्ते हर्षल रणवरे म्हणाले की , यंत्रणेने अमानुषपणे लाठी चार्ज , गोळीबार केला याबद्दल निषेध व्यक्त करत प्रशासनाने त्या ठिकाणचा प्रकार संवेदनशील पणे हाताळायला हवा होता असे मत जनतेतुन व्यक्त होत असल्याचे रणवरे म्हणाले. 

               यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे तालुका संघटक सुदर्शन रणवरे म्हणाले की , जालना येथे मराठा समाजाची विविध मागण्यासाठी उपोषण सुरू असताना  शासनाच्या 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाला गालबोट लागू नये. म्हणून राज्य शासनाने पोलीसांच्या माध्यमातून हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी प्रयत्न केले गेल्याची चर्चा आहे. यामध्ये मराठा समाजाच्या अनेक महिला वृद्ध तरुण या लाटी चार्ज मध्ये मोठी दुखापत झाल्याचे सांगत यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर सखोल चौकशी होऊन कडक कारवाई व्हावी अशी मागणी सुदर्शन रणवरे यांनी केली.

               यावेळी छत्रपती साखर कारखान्याचे संचालक अभिजित रणवरे म्हणाले की , शांततामय , शिस्तीसाठी ओळखला जाणारा मोर्चा 'सकल मराठा समाजाचे' आदर्श मोर्चे निघाले आहेत. सुदर्शन रणवरे यांनी सांगितल्या प्रमाणे वारंवार प्रशासन आंदोलन दडपण्याचे काम करत असताना समाज्याच्या मागण्या प्रशासने मान्य करुन समाज्याला न्याय द्यावा.सकल मराठा समाज्याच्या महिला ,जेष्ठ , तरुणांवर अमानुष मारहाण केली त्याबद्दल प्रशासनाचा निमसाखरच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त रणवरे यांनी व्यक्त केला.

close