shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापुरात श्रावण नागपंचमीनिमित्त मंगळागौर तसेच रक्षाबंधन निमित्त श्रावण सखी सोहळा संपन्न.

इंदापुरात श्रावण नागपंचमीनिमित्त मंगळागौर तसेच रक्षाबंधन निमित्त श्रावण सखी सोहळा संपन्न.

पतंजली योग परिवार इंदापूर व महिला पतंजली योग समिती इंदापूर यांच्या वतीने आयोजन. 
इंदापूर  प्रतिनिधी: रामदेव महाराज यांच्या प्रेरणेने  शनिवार दि २ सप्टेंबर रोजी पतंजली योग परिवार इंदापूर व महिला पतंजली योग समिती इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शहा सांस्कृतिक भवन इंदापूर येथे श्रावण नागपंचमीनिमित्त मंगळागौर तसेच रक्षाबंधन निमित्त श्रावण सखी सोहळा पारंपारिक खेळ  हा कार्यक्रम मराठी परंपरेचा व सणांचा वारसा पुढे चालवत विविध कार्यक्रमाने उत्साहामध्ये संपन्न झाला. पतंजली योग परिवार इंदापूरचे १९ वर्षापासून योगाची जनजागृती करणारे   दत्तात्रय  अनपट व  मदन चव्हाण,तसेच महिला पतंजली योग समिती इंदापूरच्या अध्यक्षा  सौ. मायाताई विंचू ,व जिजाऊ बालसंस्कार योग केंद्र चालवणारे  शहाजी बोराटे  यांच्या मार्गदर्शनाखाली व जितेंद्र माने यांचे अचूक नियोजन व पतंजली परिवाराचे सर्व योग भगिनी व योग बंधू  योग साधक यांच्या कष्टातून हा कार्यक्रम अतिशय उत्तम रित्या नियोजनबद्ध संपन्न झाला.
 या कार्यक्रमांतर्गत पुरुष बांधवांच्या वतीने सर्व  महिला भगिनींना पुरणपोळीचे स्नेह भोजन देण्यात आले. हा कार्यक्रम अतिशय देखणा आणि डोळ्याचे पारणे फेडणारा असा होता. 
या कार्यक्रमासाठी तीनशे ते साडेतीनशे महिला व पुरुष साधक यांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सुनीता गलांडे मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाच्या शेवटी  मदन चव्हाण सर यांनी सर्वांचे आभार मानले 
close