शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
सामाजिक बातमी
ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्यच्या माध्यमातून गेली आठ वर्षांपासून वृक्षारोपण तसेच वृक्षसंवर्धन मोहीम राबविण्यात येत आहे या अनुषंगानेच ग्रीन फाऊंडेशन अहमदनगर जिल्हाध्यक्ष, आदर्श पत्रकार, पर्यावरण प्रेमी, तुषार संजय महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त गेली दोन वर्षांपासून वृक्षारोपण करण्यात येते आज तिर्थक्षेत्र क्षेत्र रामदरा नागेश्वर महादेव मंदिर डोंगर परिसरात ग्रीन फाउंडेशन लोणी काळभोर यांच्या वतीने वावळा, चिंच, करंज, अर्जुन, कडुनिंब, फणस, उंबर अशा जंगली वृक्षांचे रोपण करण्यात आले.
वृक्षारोपण ही काळाची गरज आहे समाजाने हे लक्षात घेणे गरजेचे असून प्रत्येक कुटुंबातील सदस्याने वृक्षाची लागवड ही आपल्या लेकरा प्रमाणे करावी. वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यापुढेही असेच समाजोपयोगी कार्यक्रम हाती घेण्यात येतील, असे पत्रकार तुषार महाजन यांनी म्हटले.
यावेळी ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, ग्रीन फाऊंडेशन हवेली तालुका अध्यक्ष गणेश काळभोर, ग्रीन फाऊंडेशन हवेली उपाध्यक्ष नितीन सुदाम काळभोर, गणेश पातडे, जीवन जाधव, बिरूदेव भास्कर, प्रविण जाधव, दादासाहेब कोळपे, सचिन महानवर, भाऊसाहेब कोळपे, भूषन भालेराव उपस्थित होते.
वृक्ष नसते तर, आपले जीवनच इतके सुरळीत चालले आहे तितके सुरळीत चालले नसते. भरपूर प्रमाणात वृक्षतोड झाल्याने आपल्या आजूबाजूच्या वन क्षेत्र कमी होत चालले आहे. त्यामुळे कडक उन्हाळा, प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ अशा समस्या दिवसेंदिवस उद्भवत आहेत. तसेच झाडांची कमी होत चाललेली संख्या यामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. सोबतच आपले ऋतुचक्र ही बदलत चालले आहे. त्यामुळे अशा समस्यां पासून आपल्याला आपला आणि सभोवतालच्या पर्यावरणाचा बचाव करायचा असेल तर “वृक्षरोपण” करणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांनी केले.

