shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कर्मवीर अण्णांनी शिक्षकांच्या माध्यमातून शिक्षण संस्था आकाराला आणली = प्राचार्य टी. ई.शेळके

श्रीरामपूर प्रतिनिधी:
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पदमभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गोरगरिबांची आणि    उच्चतर समाजाने नाकारलेल्या मुलांसाठी शिक्षण सुरु केले.या गोरगरीब मुलांनी कमवा आणि शिका योजनेतून शिक्षण घेतले, कर्मवीरांनी त्यातील सेवाभावी आणि संस्थेला वाहून घेतलेले विद्यार्थी त्यांनाच शिक्षक केले, या शिक्षकांच्या हातात संस्थेची सर्व सूत्रे दिली, म्हणूनच रयत शिक्षण संस्था ही शिक्षकांची संस्था म्हटली जाते, असे मत अड, रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी. ई. शेळके यांनी व्यक्त केले. 

येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त कर्मवीर पुतळापूजन करण्यात आले, त्यानंतर झालेल्या अभिवादन कार्यक्रमात प्राचार्य शेळके बोलत होते. यावेळी कर्मवीर चौकात कर्मवीर पुतळ्यास पुतळ्यास पुष्पहार, पुषपांजली अर्पण करण्यात आली .माजी प्राचार्य शेळके, प्राचार्य डॉ.शन्करराव गागरे, साहित्यिक डॉ.बाबुराव उपाध्ये,विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे, प्रकाश किरण प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष लेविन भोसले आदिंनी कर्मवीरांना अभिवादन केले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमप्रसंगी वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक मनोगतातून कर्मवीर भाऊराव पाटील यांची ज्ञानतपस्वी वाटचाल विशद केली. कर्मवीरांनी दुर्लक्षित गावात, माळरानावर, डोंगरदऱ्यात शाळा काढल्या.कुणाकडून डोनेशन घेतले नाही कारण त्यांनी फाटक्या जीवनाला जवळ घेतले आणि त्यांची आयुष्ये शिवली, असे कर्मवीर आता होणे नाही.

कर्मवीर नसते तर आम्ही गुराखी किंवा ओहळाचे गोटेच राहिलो असतो असे सांगून उपस्थितांना 'हॆ मानवा, निर्मिक तू 'हा कवितासंग्रह भेट दिले. प्राचार्य शेळके यांनी कर्मवीर ज्यांना कळले त्यांचे जीवन धन्य झाले. शिक्षणाची ही ज्ञानशाळा शिक्षकांनी चालवावी हीच कर्मवीरांचे भूमिका होती, त्यामुळे संस्था प्रगतीपथावर गेली असल्याचे सांगून सर्वांना धन्यवाद दिले.प्राचार्य डॉ.शन्करराव गागरे यांनीही मनोगत व्यक्त केले.सुखदेव सुकळे यांनी आभार मानले.

संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close