अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा:
अहमदनगर जिल्ह्यात निवडणूक साक्षरता मंडळ आणि वर्शीप अर्थ फाउंडेशन यांच्या माध्यमातून मतदान जागृती अभियान जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून युवकांमध्ये मतदानाविषयी जागृती करण्याबरोबरच मतदार नाव नोंदणी अभियानाची सुरवातही करण्यात येणार आहे, या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व महाविद्यलायांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक विषयक जनजागृती करण्याबाबत नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक संपन्न झाली.
बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील, वर्शीप अर्थ फाउंडेशनचे तेजस गुजराथी, वर्शीप अर्थ फाउंडेशनचे समन्वयक अल्ताफ पीरजादे, राष्ट्रीय सेवा योजना, राहुरी कृषी विद्यापीठाचे डॉ. महावीरसिंग चव्हाण, जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. रोहिदास भडकवाड, प्रा. गणेश निमसे, सचिन कांबळे, उपस्थित होते.
महाविद्यालय व विद्यापिठातील विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक साक्षरते संदर्भात जनजागृती, प्रचार आणि प्रसार करण्यात यावा. प्रत्येक महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळाची स्थापना करून अधिक अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग या मंडळात घेण्याच्या सुचनाही यावेळी जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी यावेळी दिल्या.
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*

