shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेतकऱ्यांनी उद्योगतेची कास धरावी - विलास नलगे


बी.आर.चेडे - शिरसगांव 
महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत श्रीरामपूर येथे मधुमक्षिका पालन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. आत्मा अंतर्गत श्रीरामपूर तालुक्यात खरीप हंगामात सूर्यफूल कृषी प्रात्यक्षिक घेण्यात आले. तसेच सूर्यफूल लागवड प्रोत्साहन योजनेला मधमाशी पालन व्यवसायाची जोड मिळाल्यास आणि शेतकऱ्यांनी मध उत्पादन व त्यापासून उपपदार्थ निर्मिती केल्यास कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावेल. त्याचप्रमाणे मधु मक्षिका पालन हा जोड धंदा म्हणून देखील करता येईल. तसेच शेतकरी सूर्यफुलापासून तेल उत्पादन करू शकतात.


व्यावसायिक शेतकरी निर्माण झाल्यास शासनाचा  प्रकल्प अंतर्गत या कार्यक्रमाचा हेतू देखील साध्य होईल. मधुमक्षिका पालन प्रशिक्षण व कृषी संलग्न प्रात्यक्षिक कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांना मधमाशी पेट्या वाटप कार्यक्रम नुकताच १ व २ सप्टेंबर रोजी श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगांव येथील प्रगतीशील शेतकरी डॉ. राम काळे यांच्या वस्तीवर पार पडला, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर वरून ते बोलत होते. यावेळी मधमाशी पालन प्रशिक्षक मार्गदर्शक म्हणून गोदागिरी फार्म्स मधमाशी पालन विभागाचे ऋषिकेश औताडे यांनी उपस्थितांना मधुमक्षिका पालन बाबत प्रात्यक्षिकासह सविस्तर प्रशिक्षण दिले. सदर प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रमासाठी मा. राजाराम गायकवाड (प्रकल्प उपसंचालक आत्मा अहमदनगर),   अविनाश चंदन (तालुका कृषी अधिकारी श्रीरामपूर), अभय थोरात (कृषी पर्यवेक्षक), श्रीमती रंजना कटरनवरे (कृषी सहाय्यक) , श्रीमती मीनाक्षी बढे (बीटीएम), अभिषेक मानकर (एटीएम) व प्रशिक्षणार्थी शेतकरी उपस्थित होते.
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क श्रीरामपूर - 9561174111
close