shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बुधवारी कौठळीत होणार जंगी कुस्त्यांची मैदान.कै. नारायण (बापू) पिसाळ यांच्या पुण्यतिथीनिमित्त होणार निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान.

बुधवारी कौठळीत होणार जंगी कुस्त्यांची मैदान.

कै. नारायण (बापू) पिसाळ यांच्या पुण्यतिथीनिमित्त होणार निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान.
इंदापूर प्रतिनिधी: कै. नारायण (बापू) सखाराम पिसाळ यांचे पुण्यतिथी निमित्त कौठळी (ता. इंदापूर) येथे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान बुधवार दिनांक १३ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी तीन वाजता समस्त ग्रामस्थ कौठळी यांच्या वतीने आयोजित केले असून या कुस्ती मैदानावर माजी राज्यमंत्री तथा आमदार दत्तात्रय भरणे,  आमदार यशवंत माने,पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, मा. सभापती पुणे जिल्हा परिषद पुणे प्रवीण माने  यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मैदानात अनेक नामवंत पैलवानाची कुस्तीची कसरत या ठिकाणी नेत्र दीपक पद्धतीने पाहण्यास मिळणार आहे यामध्ये प्रथम क्रमांक ची कुस्ती पैलवान भारत मदने मुंबई महापौर केसरी बारामती कुस्ती केंद्र बारामती विरुद्ध पैलवान समीर देसाई पुणे महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे यांचा पट्टा यांच्याबरोबर होणार आहे. तर क्रमांक दोन ची कुस्ती पैलवान राघू ठोंबरे कोल्हापूर विरुद्ध पैलवान मनीष रायते पुणे यांच्याबरोबर होणार आहे .तसेच क्रमांक तीन ची कुस्ती पैलवान सागर शिंदे कौठळी विरुद्ध पैलवान देवराज पवार पुणे यांच्याबरोबर होणार आहे. तसेच अनेक इतर कुस्ती  नेमलेले आहेत अशी माहिती राहुल पिसाळ यांनी दिली. या कुस्ती मैदानाचे आयोजन कौठळी सोसायटीचे माजी चेअरमन पैलवान सुभाष पिसाळ, कौठळी विकास सोसायटीचे संचालक महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान संतोष पिसाळ व राहुल पिसाळ यांनी केले आहे
close