श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालय बेलवाडी मध्ये खेळाचे किट व गणवेश वाटप .
इंदापूर प्रतिनिधी:आज दि. १२ सप्टेंबर २०२३ रोजी आपल्या विद्यालयात कबड्डी किट व गणवेश वाटप करण्यात आले .
दि.माळेगाव स.सा.का.लि.माळेगाव कारखान्याचे मा.संचालक अशोकराव तावरे (लाखे) यांचे वतीने १७वर्षाखालील मुलांना कबड्डी किट तसेच विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना जेवन देण्यात आले.
तसेच बेलवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य पंकज सर्जेराव जामदार यांचे वतीने १४ वर्ष वयोगटातील मुलींना कब्बडीचे किट देण्यात आले
त्याचप्रमाणे बारामती बिल्डर असो.वतीने दत्तात्रय संपतराव रणवरे यांनी गरजु व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले .
बारामती नगर परिषदेचे नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते ॠतुराज काळे यांचे वतीने १ हजार वही वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले.
वरिल सर्व कार्यक्रम मंगळवार दिनांक १२/९/२०२३ रोजी माळेगावचे संचालक अशोकराव तावरे यांचे अध्यक्षेतेखाली व पंकज सर्जेराव जामदार यांचे उपस्थित विद्यालयात पार पडला
सदर कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक निंबाळकर भालचंद्र सर सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाळासो जामदार सर यांनी केले व आभार प्रदर्शन श्री उबाळे सर यांनी केले

