shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सोमनाथ चौधर सर यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

 सोमनाथ चौधर सर यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान 
इंदापूर प्रतिनिधी: निमसाखर येथील एन ई एस हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील  सोमनाथ भानुदास चौधर सर यांना पुणे जिल्हा मराठी अध्यापक संघ यांच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श (गुणवंत) शिक्षक पुरस्कार व सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले. पुणे जिल्हा मराठी अध्यापक संघाने आयोजित केलेल्या शिक्षक साहित्य व गुणवंत शिक्षक पुरस्कार सन्मान सोहळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह गंज पेठ पुणे येथे संपन्न झाला या कार्यक्रमात शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल  सोमनाथ भानुदास चौधर सर यांना आदर्श (गुणवंत) शिक्षक पुरस्कार व सन्मान चिन्ह माननीय आमदार रवींद्र धंगेकर यांचे हस्ते देण्यात आले.यावेळी सकाळ वृत्तपत्राचे उपसंपादक  खुटवड साहेब, मायबोली राज्य संघाचे अध्यक्ष लक्ष्मणराव महाडिक, राष्ट्रसेवा दल शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक शिवाजीराव खांडेकर, माजी शिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ साहेब पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष  नंदकुमार सागर सर, मराठीतअध्यापक संघाचे अध्यक्ष हनुमंतराव कुबडे सर,आपटे प्रशालाच्या प्राचार्य मेगा सिन्नरकर मॅडम तसेच प्रसिद्ध गायक विवेक पांडे, सौ कल्पना शेरे मॅडम, सौ कारले मॅडम, गाजरे सर इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल सोमनाथ चौधर सरांचे मित्र परिवाराकडून अभिनंदन करण्यात आले.
close