shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मूर्ती मधील देवत्वाला प्राप्त करण्यासाठी भाव महत्वाचा-ह.भ.प.श्रीराम महाराज विडेकर..!!

विडा येथे खंडोबा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा..

प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी :-

मूर्ती मधील देवत्वाला प्राप्त करण्यासाठी भाव महत्वाचा आसल्याचे प्रतिपादन ह.भ.प.श्रीराम महाराज विडेकर यांनी विडा येथे खंडोबा मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमीत्ताने आयोजित किर्तना प्रसंगी केले आहे.

विडा येथे खंडोबा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोमवार दि (११) रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आली.या निमित्ताने ह.भ.प.श्रीराम महाराज विडेकर यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी संत नामदेव महाराजावर पांडुरंगाला नैवेद्य घेऊन जाण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्यातील भाव आणि भक्ती पाहून अक्षरश:पांडुरंगाने नैवद्याचे सेवन केले.असाच भाव व भक्तीने भगवंतांचे चिंतन केल्यावर मुर्ती मधील देवत्वाला प्राप्त करता येत असल्याचे ह.भ.प.श्रीराम महाराज विडेकर यांनी किर्तनात म्हटले.याप्रसंगी गायनाचार्य ह.भ.प.परमेश्वर महाराज सोन्नाखोटा तर मृदंगसाथ ह.भ.प.अशोक पटाईत यांनी दिली. या प्रसंगी भाजपाचे जेष्ठ नेते तथा  सामाजिक कार्यक्रते नंदकिशोर मुंदडा काकाजी ,विडा गटाचे  जि.प.सदस्य विजयकांत (भैय्या) मुंदडा,पंचायत समिती सदस्य पिंटु ठोंबरे,जेष्ठ नेते अशोक वाघमारे,विड्याचे सरपंच सुरज पटाईत,सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमण अंकुश कलाणे,भाजपाचे युवा नेते डाॅ.धनराज पवार,ॠषीकेश पटाईत,दिपक वाघमारे यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक-भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लालासाहेब न्ननवरे यांनी परिश्रम घेतले.*
close