श्रीरामपूर प्रतिनिधी:
लोकनेते माजी आ.भानूदास मुरकुटे यांचे नेतृत्वाखाली तालुक्यातील टाकळीभान ग्रामपंचायत येथे सात बारावरील पोट खराबा नोंद कमी होण्यासाठी विशेष कॕम्प घेण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी किरण सावंत पाटील व तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी १०० हेक्टर क्षेञावरील पोट खराब्याची नोंद सात बारा उताऱ्यावरून कमी केली. याबद्दल संबंधित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
याबाबतची माहिती अशी की, टाकळीभान शिवारातील गट नंबर १४१/१, १४१/२, १४३/३, १४१/४, १५० व १५१ यापैकी गटांचे जमिनीवर पोटखराबा वर्ग अ मधील क्षेत्र लागवडी खाली आणावे अशी संबंधित शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासून मागणी होती. याप्रश्री माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी लक्ष घालावे, अशी मागणी होती. त्यानुसार माजी आ.मुरकुटे यांनी याप्रश्नी प्रांताधिकारी व तहसीलदार यांचे उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात कॅम्पचे आयोजन केले होते. या कॕम्पमध्ये प्रांताधिकारी व तहसीलदार यांचे सहकार्याने पोट खराब्याची नोंद हटवून सदर क्षेत्र लागवडीखाली आणले. यामुळे संबंधित शेतकऱ्यांचा कर्ज, ई-पिक पाहणी, पीक विम्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी माजी आ.मुरकुटे, प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ तसेच मंडळ अधिकारी ओहोळ, कामगार तलाठी हिवाळे व भडकवाल, क्लार्क संदीप जाधव यांना धन्यवाद दिले आहेत.
यावेळी अशोक कारखान्याचे माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, माजी व्हा.चेअरमन दत्तात्रय नाईक, अशोक कारखान्याचे संचालक यशवंत रणनवरे, मार्केट कमिटीचे संचालक मयुर पटारे, सुनिल बोडखे, भागवत रणनवरे, भैय्या पठाण आदिंसह संबंधित शेतकरी उपस्थित होते.
संकलन:
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111

