साक्री,धुळे :-तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे निकटवर्ती म्हणून ओळख असलेले औसा मतदार संघाचे लोकहितवादी लोकप्रिय आमदार मा.अभिमन्यूजी पवार साहेब यांनी वडार समाजाचे काही नेते यांच्या विनंतीचा सन्मान करीत माझाच समाज या आत्मियतेने त्या टीमचे नेतृत्व करत मा.फडणवीस साहेब यांचेकडून 3 जून 2018 ला लातूर येथे मेळाव्याची तारीख मिळवून समाजाच्या टीमसह अहोरात्र प्रयत्न करून मेळावा यशस्वी करून दाखविला त्या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून विद्यमान मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब व पवार साहेब यांच्या सुचनेनुसार आम्ही ओसिसिआयच्या महाराष्ट्र टीमने कर्नाटक स्थित वडार समाजाचे राष्ट्रीय धर्म गुरू प.पू.इम्माडी सिद्धरामेश्वर स्वामी,कर्नाटकचे माजी मंत्री, भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य व विद्यमान आमदार मा.अरविंदजी लिंबावळी, ओसिसिआयचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरलाल ओड,राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.रविजी माकलि यांच्या उपस्थितीत लातूर येथील मेळावा संपन्न झाला,.
वडार समाजाच्या नेत्यांच्या परंपरेनुसार मेळावा पार पाडून स्वतासाठी अथवा स्वार्थासाठी काही मिळविण्यात समाजाच्या शक्तिला गहाण न ठेवता पांदण रस्त्याचे शेतकरी हित,जनहित शिल्पकार मा.आ.अभिमन्यूजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली वडार समाजाच्या काही नेतेगणांनी काहिंना अगदीच छिचोरे समजत होते.परंतू लातुरचे कार्यक्रमाचे मुख्य पदाधिकारी व याच यूवकांनी वारंवार पाठपुरावा करीत उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडून अधिवेशनात प्रस्ताव मांडणिसह आर्थिक तरतूद करणे सह व मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब,व उपमुख्यमंत्री मा. अजितजी पवार साहेब यांच्या सहमती सह मंत्रिमंडळात मंजूर करून घेण्यासह पै. मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ हे नाव देण्यासाठी त्यास समाजाची तालुका, जिल्हा,महानगर वाईज भौगोलिक,सांस्कृतिक पुरक माहीती शासनास देणारे एकमेव प्रयत्नवादी आ.मा.पवार साहेबच यासाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून वडार समाजातील कोण कोणत्या समाज सेवकांचे आटोकाट प्रयत्न व समाजाप्रति असलेलि हिताच्या भावनेतून त्यांची महत्वाकांक्षा उपयोगी पडली हे मा.पवार साहेब अगदी आत्मियतेने जाणून आहेत.
एव्हढे सगळे सुस्पष्ट चित्र महाराष्ट्रातील समाज उघड्या डोळ्यांनी पाहात असतांना ही स्वार्थ,व श्रेयाच्या लिलावात समाजाचे हित नष्ट करण्यास कारणीभूत असलेल्या परंपरेच्या शापात आता ही काही नेते डोके वर करु पाहात असून श्रेय व महामंडळात नाव येण्यासाठी केविलवाणी आटापिटा बर्याच छोट्या मोठ्या नेत्यांमध्ये चालू असल्याचे शासन प्रतिनिधी व समाजालाही लक्षात आले आहे.समाजात जे मनापासून धडपडले, दिवसरात्र पाठपुरावा केला, त्यांना मोठेपणा देण्याची समाजातील नेत्यांमध्ये का प्रवृत्ती नाही... हीच समाजात फार मोठी शोकांतिका आहे.ज्यावेळी मोठेपणा देण्याची नेत्यांमध्ये प्रवृत्ती निर्माण होईल, त्याचवेळी समाजाचा खरा विकास होईल, मोठेपणा देणार्यांनाही खरा मान सन्मान मिळेल यात शंका नाही.
परंतू या वेळेस समाज व समाजातील काही नेते ज्यांचा हात धरून समाजाचे हित साधणेसाठी मार्गस्थ झाले आहेत ते मा.आ.अभिमन्यूजी पवार साहेब हे समाजाच्या मागण्या व आर्थिक विकास महामंडळाचा फायदा हा समाजाला मिळवून देतीलच यात कुठलिही शंका-कुशंका नाही अथवा अडसर आणण्याचे नतद्रष्ट विचार ही कामात येणार नाही.
वसंत गुंजाळ,
साक्री,धुळे.

