व्याहाळी केंद्राची शिक्षण परिषद हसतखेळत संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: आज शुक्रवार दिनांक ०१/०९/२०२३ रोजी दुपारी २.३० ते ५ या वेळेत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा व्याहाळी येथे माहे-ऑगस्ट २०२३ ची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद पुष्प-दुसरे आयोजित करण्यात आले.*
या शिक्षण परिषदेचे *प्रास्ताविक चंद्रकांत रामाने सरांनी केले.* उपस्थित सर्व शिक्षकांनी केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेची पूर्व चाचणी लिंक सोडवली.
शिक्षण परिषदेसाठी सुलभक राजश्री मदने मॅडम यांनी *नवीन शैक्षणिक धोरण व अध्ययन निष्पत्ती विषय मराठी* या विषयावर मार्गदर्शन केले.
श्री चंद्रकांत रामाने सर यांनी *इंग्रजी अध्ययन निष्पत्ती विषयी* मार्गदर्शन केले. श्री राजकुमार भोंग सरांनी *इयत्ता निहाय अध्ययन निष्पत्ती कृती आराखडा* या विषयावर मार्गदर्शन केले सर्व उपस्थित शिक्षक गट कार्यामध्ये सहभागी झाले.
शेवटी शिक्षण परिषदेसाठी उपस्थित सर्व शिक्षकांचे *श्री. किरण म्हेत्रे सरांनी आभार मानले* व केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न झाली.

