*इच्छापूर्ती श्री संत गुणवंत गजानन साई मूर्तीची प्रतिष्ठापना
*तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रमास भाविकांची अलोट गर्दी
*तिन्ही मूर्तींसह धार्मिक रॅलीने अमरावती शहर दुमदुमले
---------------------------------------------------------
*परभणी : अमरावती शहरातील तड्डा कॉलनी राहुलनगर येथे ईच्छापूर्ती श्री संत गुणवंत गजानन साई त्रिमुर्तीची विधीवत पद्धतीने संत महंत व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ३ दिवसीय धार्मीक कार्यक्रमाने प्रतिष्ठापना करण्यात आली. याच कार्यक्रमात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता संजय कुलकर्णी (सुपेकर) यांच्यासह अनेकांना धर्मभुषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले. या धार्मीक कार्यक्रमात खासदार डॉ.अनिल बोंडे, आमदार प्रविण पोटे पाटील, मा.आ.ज्ञानेश्वर ढाणे पाटील, आयोजक संजय आठवले, डॉ. धनराज चक्रे, संपादक मनोहर बारशे, सभापती सचिन पाटील, सौ. प्रभाताई आवारे, डॉ. गोविंदभाई कासर, डॉ. सौ. शोभा गायकवाड आदी. उपस्थित होते.
*परभणी जिल्हा प्रतिनीधी :
अमरावती येथे सोशल वेल्फेअर इन्स्टिट्यूट आणि महाराष्ट्र बेस्ट न्यूज चे प्रमुख व या धार्मीक कार्यक्रमाचे आयोजक संजय आठवले यांनी तड्डा कॉलनी, राहुलनगर येथे ईच्छा पूर्ती श्री संत गुणवंत गजानन साई त्रिमूर्ती च्या मंदीराची ढोल ताशे, रथ, बग्गी, लाईटिंगछत्री, फटाक्यांच्या अतिष बाजीत विधीवत पद्धतीने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दिनांक १८ ते २० सप्टेंबर या ३ दिवस धार्मीक कार्यक्रमांनी अमरावतीचा परिसर दुमदुमुन टाकला, याच कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या
महाराष्ट्रातील असंख्य सामाजिक कार्यकरर्ते असलेल्या समाजसेवकांना धर्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. यात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता संजय कुलकर्णी (सुपेकर) यांनी गेल्या २३ वर्षापासुन धार्मिक, शैक्षणिक, सार्वजनिक समाज हिताचे असंख्य कार्य केल्यामुळे त्यांना धर्मभूषण पुरस्काराने संत महंत व विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करून त्यांच्या हस्ते असंख्य कर्तृत्वान महिला- पुरुषांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. या ३ दिवसीय घेण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमात देश आणि राज्यभरातील विविध ठिकाणावरून मान्यवरांनी हजेरी लावली होती.
या धार्मिक कार्यक्रमात खासदार डॉ.अनिल बोंडे, आमदार प्रविण पोटे पाटील, मा. आ. ज्ञानेश्वर ढाणे पाटील, भाजपाचे नेते तुषार भारतीय, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता संजय कुलकर्णी (सुपेकर), आयोजक संजय आठवले, डॉ. धनराज चक्रे, सभापती सचिन पाटील, संपादक मनोहर बारशे, मा. नगरसेविका प्रभाताई आवारे, समाजसेवक डॉ. गोविंदभाई कासर, गणोरकर दादा महाराज (मठ) नवल शिरसाठ, गोविंद राठोड, छत्रपती संभाजीनगर, सौ. ज्योतीताई वैद्य, सौ. शिल्पाताई पाचघरे, जितेंद्र शर्मा ( जयपुर - राजस्थान), डॉ. शोभाताई गायकवाड आदी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोमवार दि.१८ सप्टेंबर रोजी दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत श्री संत गुणवंत महाराज, श्री संत गजानन महाराज,श्रीसाईबाबा यांच्या तिनही मुर्तीची अमरावती शहरातुन रथ बग्गी ढोल ताशांच्या गजरात असंख्य भाविक भक्त व मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या धार्मीक मिरवणूकीने संपुर्ण अमरावती शहर दुमदुमुन गेले होते. सर्वच जाती धर्मांच्या नागरीकांनी या धार्मिक उत्सवात मोठ्या संखेने सहभाग नोंदविला.
मंगळवार दि.१९ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत या तिनही संत महंतांची विधीवत पद्धतीने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिष्ठापना करून भाविक भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी सर्वच क्षेत्रातील नागरीकांनी धार्मिक उत्सव सोहळ्यात महाप्रसादाचा अस्वाद घेतला. दुपारी ३ ते ५ वेळात आजी - माजी सैनिक सेवानिवृत्त कर्मचारी यांच्यासह महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या यशस्वी महिला-पुरूषांना धर्मभुषण पुरस्काराने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता संजय कुलकर्णी (सुपेकर), मा.आ.ज्ञानेश्वर ढाणे पाटील, समाजसेवक डॉ. गोविंदभाई कासर, आयोजक संजय आठवले, संपादक मनोहर बारशे, सभापती सचिन पाटील, डॉ. धनराज चक्रे, आदींच्या हस्ते सौ. स्मिता चौभे, सौ. देव्यानी, सौ. कांताताई काळे सौ.रोशनीताई वाकडे, सौ. स्मिताताई बत्रा, मा. महापौर सौ. संध्याताई टिकले, भाजपा नेत्या सौ. सुरेखाताई लुंगारे, प्रा. मोहन इंगळे, संपादक सचिन ढगे, सौ. निताताई तिवारी, सौ. बरखाताई बोजे, गणोरकर दादा महाराज यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या मान्यवरांना विविध पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले.
तर संध्याकाळी ६ ते १० पर्यंत महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध सिने पार्श्व गायक, गितकार, संगितकार, प्रबोधनकार, प्राध्यापक मोहन इंगळे यांच्या बहारदार हरदयस्पर्शी भक्तीगितांनी प्रेक्षकांना अगदी मंत्रमुग्द केले. तट्ट कॉलनी राहुलनगर परीसरात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या मंदीराचे लवकरच उर्वरीत राहीलेले काम पुर्ण करण्यात येणार असल्याची माहीती आयोजक संजय आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
हा धार्मीक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश सरदार, नंदलाल मोहकार, जगदीश कांबे, ॲड.राजेश बत्रा, राजु सदाशिव, पी. बी. आंभोरे गुरूजी, सुधीर थोरात, प्रकाश पुनसे, सचिन ढगे, प्रविण खंडार, राजेंद्रसिह बघेल, राम पिछेल, ओमप्रकाश चव्हाण, दादासाहेब वानखेडे, राजेंद्र वानखेडे, पुजा परीहार, तुलसी बिरेली, उमेश वानखेडे, अतुल बोबळे, राजेश चक्रे, संजय मोहने, डॉ. धनराज चक्रे, सुधीर तलमले सचिन पाटील यांच्यासह महीला मंडळांनी देखील हा धार्मीक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परीश्रम घेतले. शेवटी या ३ दिवसीय धार्मीक कार्यक्रमास प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांचे देखील आयोजक संजय आठवले यांनी आभार मानले.
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111

