shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातूनआगामी काळात नवनवीन व्यवसाय शिक्षण सुरू करण्यासाठी प्रयत्नशील - पद्माताई भोसले

शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून
आगामी काळात नवनवीन व्यवसाय शिक्षण सुरू करण्यासाठी प्रयत्नशील - पद्माताई भोसले
इंदापूर(प्रतिनिधी): "आजच्या स्पर्धेच्या युगात नोकरी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे कौशल्य मिळवून व्यवसाय उभा करून स्वावलंबी बनणे आवश्यक आहे. त्यासाठी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दिले जात असलेले व्यवसाय शिक्षण फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे आगामी काळात नवनवीन व्यवसाय शिक्षण सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे," अशा  ट्रस्टच्या अध्यक्षा पद्माताई भोसले 
शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सुरू असलेल्या व्यवसाय शिक्षण प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण घेत यशाची गरुडझेप घेतलेल्या माजी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे इंदापूर येथे आयोजन केले होते. त्यावेळी पद्माताई भोसले बोलत असताना म्हणाल्या. यावेळी ट्रस्टचे सचिव डॉ. गिरीश देसाई, खजिनदार तुषार रंजनकर, विश्वस्त अरविंद गारटकर, दीनदयाल उपाध्याय कौशल्य 'विकास योजना रायगडचे प्रकल्प
संचालक हुसेन अजिते, हरीश हुकमानी, राकेश फडतरे, जयवंत नायकुडे आदी उपस्थित होते.

यावेळी भोसले म्हणाल्या, "शिक्षणासाठी शहरामध्ये न जाता शिक्षणच ग्रामीण भागातच आणावे, या हेतूने सन २०१६ मध्ये स्थापन केलेल्या शंकरराव चॅरिटेबल

ट्रस्टच्या माध्यमातून व्यवसाय शिक्षणाची संधी दिली. त्याच्या माध्यमातून तरुणांनी साधलेली प्रगती पाहून समाधान वाटते. "

यावेळी डॉ. देसाई म्हणाले, "आतापर्यंत संस्थेच्या माध्यमातून ६ हजार विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण दिले आहे." हुसेन अजिते

म्हणाले, "रायगड येथे संस्थेच्या वतीने सुरू केलेल्या व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण केंद्रात नर्सिंगसारखे कोर्स मोफत दिले जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील अधिकाधिक विद्याथ्र्यांनी लाभ घ्यावा." तुपार रंजनकर म्हणाले, "शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या कारभारामुळे संस्थेतून मोठ्या प्रमाणावर युवक व युवती यांना रोजगाराची संधी मिळाली.ऊस तोडणीच्या हंगामामध्ये आपले गाव सोडून कर्मयोगी व नीरा भीमा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ऊस तोडणी मजुरांसाठी कोपीवरच आरोग्य तपासणी व मुलांना शाळा उपक्रम राबविण्यात आला. त्यासाठी कारखान्यांचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. त्यामुळे हा उपक्रम जिल्ह्यासह राज्यात आदर्श व पथदर्शी ठरला. याचा आनंद वाटतो.



महादेव चव्हाण ,भारत बोराटे, दीपक जगताप, अमोल राऊत, त्रिशला पाटील, अंगरिका मांडे, पल्लवी चौगुले, निता शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. उपक्रमांना सहकार्याबद्दल डॉ. नीलेश कुंभार, डॉ. सारंगी कुंभार, अंकिता चव्हाण, अनुष्का चव्हाण, हमीद आतार यांचा सत्कार केला.

अरविंद गारटकर यांनी आभार मानले. संतोष नरुटे यांनी सूत्रसंचालन केले.
close