shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भटक्या विमुक्त जाती जमाती सेलच्या पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी अण्णासाहेब धोत्रे यांची निवड.प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ,जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या उपस्थितीत देण्यात आले नियुक्तीपत्र.

भटक्या विमुक्त जाती जमाती सेलच्या पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी अण्णासाहेब धोत्रे यांची निवड.

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ,जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या उपस्थितीत देण्यात आले नियुक्तीपत्र.

इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील कालठण नं. १ येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते अण्णासाहेब धोत्रे यांची दि. ९ सप्टेंबर २०२३ रोजी पुणे येथील पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती पत्र वितरण समारंभ व शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षकांना पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अण्णासाहेब धोत्रे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार ,प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी धोत्रे यांची भटक्या विमुक्त जाती जमाती सेलच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्तीपत्र देऊन निवड केली.

 अण्णासाहेब धोत्रे यांनी यापूर्वी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी अतिशय चांगली काम केले होते. त्या कामाची दखल घेऊन त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करून काम करण्याची संधी दिली होती .त्यांनी त्या पद्धतीने काम चालू केले होते. यानंतर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुन्हा त्यांना जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली असल्याची माहिती त्यांनी दिली. सदर त्यांच्या निवडीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
close