shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बांडेवाडी शाळेत बालचमुची दहीहंडी संपन्न.*


*बांडेवाडी शाळेत बालचमुची दहीहंडी संपन्न.*

*राधाकृष्ण वेशातील मुले बनली दहीहंडीचे आकर्षण..*
इंदापूर प्रतिनिधी: दि 9 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी बांडेवाडी यांचे संयुक्तपणे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले. *सुंदर रांगोळी , पताका , फुगे , हाराने दहीहंडी सजवण्यात आली.* शाळा समिती पदाधिकारी यांचे हस्ते दहीहंडी पुजन करण्यात आले. *मुलांनी तीन थर रचत दहीहंडी फोडली.* दहीहंडीती चुरमुरे , खडीसाखर , फुटाणे प्रसाद सर्वांना वाटला.       *यावेळी राधा कृष्ण गवळी , हिंदी , मराठी गीतांवर मुलांनी अप्रतिम डान्स सादर केला.* पालकांचे वतीने सर्व मुलांना बिस्कीट , चाॅकलेट खाऊ वाटप करण्यात आला. *दहीहंडी नियोजन मुख्याध्यापक संतोष हेगडे , शिक्षक ललिता वाघमोडे , उर्मिला बांडे यांनी केले.* यावेळी शाळा समिती उपाध्यक्ष राजू मुलाणी ,
आण्णासाहेब बांडे , सचिन बांडे , संतोष डोंगरे , सारिका बांडे , तृप्ती बांडे , अश्विनी राहिगुडे , सिरिन सय्यद व मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.

close