shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वाहन चालवताना विद्यार्थ्यांनी रस्त्याचे नियम पाळणे गरजेचे - सुरज पाटील

वाहन चालवताना विद्यार्थ्यांनी रस्त्याचे नियम पाळणे गरजेचे - सुरज पाटील

इंदापूर येथे रोटरी - रोट्रॅक्टच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोटार वाहन कार्यशाळा : ५०० विद्यार्थ्यांचा कार्यशाळेत सहभाग 
फोटो ओळ : इंदापूर विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक महाविद्यालयात मोटार वाहन कार्यशाळेत बोलताना वाहन निरीक्षक व मान्यवर
इंदापूर ( प्रतिनिधी ) : परिवहन विभागाच्या माहितीनुसार, रस्ते अपघातात नागमोडी वळण, घाटमाथा, गतीरोधक, शहर व ग्रामीण भाग यामध्ये सर्वाधिक अपघात हे सरळ रस्ता असलेल्या ठिकाणीच झाले असल्याची नोंद आहे. कारण सरळ रस्ता असल्यास वाहन चालक भरधाव वेगाने गाडी चालवतात. त्यामुळे सर्वाधिक अपघात झालेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाहन चालवताना रस्त्याचे सर्व नियम पाळणे आवश्यक आहेत. असे आवाहन बारामती परिवहन विभागाचे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सुरज पाटील यांनी केले. 
इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या सभागृहात, शनिवार ( दि. ९ सप्टेंबर ) रोजी, रोटरी क्लब ऑफ इंदापूर, रोट्रॅक्ट क्लब ऑफ इन्द्रेश्वर व विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजच्या आटोमोबाईल विभागाच्या वतीने, मोटार वाहन प्रशिक्षण कार्यशाळा व लर्निंग लायसन्स नोंदणी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
 यावेळी कार्यक्रमास इंदापूर रोटरी क्लबचे संस्थापक उपाध्यक्ष मुकूंद शहा, प्राचार्य प्रा. डी. के. महाडिक, रोटरीचे अध्यक्ष आझाद पटेल,  कौन्सिल मेंबर सागर शिंदे, रोट्रॅक्ट क्लब ऑफ इन्द्रेश्वरचे अध्यक्ष आकाश खरात, सचिव मच्छींद्र किरकत, रोटरी डिस्ट्रिक्ट डायरेक्टर वसंतराव मालुंजकर, ज्ञानदेव डोंबाळे, माजी अध्यक्ष नरेंद्र गांधी, सचिव प्रशांत भिसे, धरमचंद लोढा, मोरेश्वर कोकरे, मनोहर बेंद्रे, प्रा.सुनील शिंदे, प्रा. प्रफुल्ल कांबळे, अप्पा तनपुरे, नागेश तनपुरे, सहदेव बराटे आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी बोलताना सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक धैर्यशील लोंढे म्हणाले की, विद्यार्थ्यांना वाहन चालवताना परवाना आवश्यक आहे. अनवधानाने अपघात झाला तर कायदेशीर बाब निर्माण झाल्यास, सर्वात प्रथम तुमचे वाहन लायसन्स तपासणी केली जाते. तसेच तुमच्या अपघाती विम्यासाठी देखील त्याचा खूप उपयोग होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे वाहन परवाना असणे आवश्यक आहे. विना परवाना वाहन चालविणे यासाठी शासनाने आता नवीन नियमानुसार दहा हजार रुपये दंड आकारला आहे. 

यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जमीर शेख, अप्पा तनपुरे, अक्षय तनपुरे, आदित्य लांबरुड, अरबाज शेख, कृष्णा काटेकर, राजरत्न रणवरे, ऋषी ननवरे, प्रशांत चडचणकर, विश्वजीत कांबळे, रविराज माने, अनिकेत व्यवहारे, सागर तनपुरे यांनी प्रयत्न केले. 

चौकट : शाळेतील मूल्यशिक्षण आयुष्यभर उपयोगी येते

विद्यार्थ्यांना शाळा, विद्यालय व महाविद्यालयात शिकवले जाणारे मूल्यशिक्षण माणसाच्या खाजगी जीवनात प्रचंड उपयोगी येते. त्याचबरोबर प्रामाणिकपणा, विश्वास आदी मूल्य विद्यार्थ्यांनी जोपासल्यास, विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस त्याचा खूप मोठा उपयोग होईल. त्यामुळे विद्यार्थ्यां आयुष्य जगत असताना,  मूल्यशिक्षण खूप मोलाचे ठरत असते. असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे संस्थापक उपाध्यक्ष मुकुंद शहा यांनी केले. 


close