बुधवार दि. ६ सप्टेंबर २०३३ शाळेमध्ये "दहीहंडी उत्सव "मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
"दहीहंडी"साठी शाळेतील अनेक विद्यार्थी राधा, कृष्ण, गोपाल, गोपिका, यांच्या वेशात सहभागी झाले होते.
श्रावण महिन्यात वैद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री मथुरेत कंसाच्या बंदी शाळेत कृष्णाचा जन्म झाला त्याला "कृष्ण जन्माष्टमी" कृष्ण जन्मदिवस म्हणजे "गोकुळाष्टमी" म्हणून संबोधले जाते.
श्रीकृष्ण यशस्वी मुसदी, धर्म साम्राज्याचा उत्पादक, धर्माचा महानप्रचारक, दृष्टांचा सर्वनाम करणारे, निरपराधांचे रक्षक, भक्तवत्सल भक्ताभिमानी, संबोधले जातात.
शाळेतील विद्यार्थ्यांना दहीहंडी उत्सवाचे महत्त्व समजावे, भारतीय रूढी, परंपरा सण ,यांची माहिती व्हावी, संस्कृतीची ओळख व्हावी, मूल्यांचा विकास व्हावा, आनंद प्राप्ती या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.विद्यार्थ्यांना "गोपालकाला" श्रीकृष्णजन्म याविषयी मीनल पाटील, सायली संत यांनी गोष्टी सांगून माहिती दिली. विद्यार्थी त्यामधे रमूण गेले होते. उत्सुकतेने ऐकत होते.
शाळेच्या प्रांगणात सुंदर सजावट करून मुलांच्या वयोगटाचा विचार करून छोटीशी दहीहंडी उभारण्यात आली होती.शाळेत बांधलेल्या "दहीहंडी" खाली साऊंड सिस्टिम वरील गाण्याच्या ध्वनीवर, विद्यार्थ्यांनी मनसोक्त नाचण्याचा बागडण्याचा आनंद घेतला. यावेळी गोविंदा आला रे गोविंदा आला!
गोविंदा रे गोपाला!
अशा घोषणा देत परिसर दुमदुमून गेला होता.
गाण्यांवर नाचण्याचा मनमुराद आनंद घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी छोटेसे मनोरे करून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला. व अंतिमता दहीहंडी फोडण्यात आली.दहीहंडी फोडल्यानंतर सर्व मुलांना गोपालकाल्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे संयोजन: प्राचार्यांच्या मार्गदर्शना खाली शाळेतील सर्व शिक्षक/शिक्षकेतर वर्ग यांनी केले.नारायण हट शिक्षण संस्थेची शाळा, आनंददायी, संस्कारक्षम, व विद्यार्थ्यांच्यासर्वांगीण विकासाचे केंद्र म्हणून विकसित होत आहे. परिसरात या शाळेचा नावलौकिक वाढत आहे.

