खेड सेझ प्रकल्पातील २००८ मध्ये अस्तित्वात आला. या प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांचा १५% परतावा प्रश्न गेली १५ वर्षे प्रलंबित असून त्यासाठी बाधित शेतकऱ्यांच्या वतीने न्यायालयीन प्रक्रिया, विविध प्रकारची आंदोलने, चर्चा बैठका , संबंधित विभागातील अधिकारी, प्रमुख, यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन सततच्या पाठपुराव्यामुळे उद्योग मंत्री, उदय सामंत यांनी या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी के. डी .एल .ची जमीन एम.आय.डी.सी .मार्फत संपादित करून शेतकऱ्यांना चांगला मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे.
मा. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्याबरोबर सह्याद्री अतिथीगृहात बैठक संपन्न होऊन के .डी. एल. कंपनीची म्हणजे शेतकऱ्यांची परताव्याची जमीन १४९ हेक्टर एम.आय.डी.सी. मार्फत संपदनाचा शिक्का मुहूर्तब झालेला आहे.शासनाच्या वतीने झालेल्या निर्णयानुसार एम.आय.डी.सी. कार्यालयाकडून दि.५ मे २०२३ रोजी जमीन संपादनाबाबत जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यानुसार खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीकडून कंपनीच्या १४९ हेक्टर जमीन संपादना बाबतचा प्रस्ताव एम.आय.डी.सी. कार्यालयास दिनांक २३जून २०२३ रोजी विहित मुदतीत दाखल करण्यात आला आहे. सदर प्रस्तावात मोबदल्या संदर्भात किंवा अन्य बाबतीत काही त्रुटी व किंवा उणिवा असतील त्याबाबत साधक-बाधक चर्चा शेतकरी हिताचा निर्णय घेण्यासाठी खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी(के. डी. एल.) सी.एस.,सभासद शेतकरी प्रतिनिधी, व संबंधित अधिकारी अशी बैठक लवकरात लवकर आयोजित करून मोबदल्या संदर्भात शेतकरी हिताचा योग्य तो चांगला निर्णय शासकीय पातळीवरूनच व्हावा. यासाठी बाधित शेतकरी प्रतिनिधींच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनावर लवकरच कार्यवाही होऊन लवकर बैठक होईल व शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळेल अशी अपेक्षा शेतकरी प्रतिनिधींनी व्यक्त केली. शेतकऱ्यांनी शासकीय पातळीवरूनच मोबदला घेण्याचा निर्धार केलेला असून त्यादृष्टीने प्रयत्न चालू असून त्याला यश मिळणार आहे.
अधिकाऱ्यांबरोबर केलेल्या चर्चेनुसार सध्या जमिनी संपादनाची "स्थल पाहणी" चालू असून त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया होणार आहे. असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खाजगी पातळीवर शेअर्स विक्री न करता शासकीय पातळीवरूनच चांगला मोबदला मिळवण्यासाठी केल्याजात असलेल्या प्रयत्नांना साथ देण्याची गरज आहे. असे शेतकरी प्रतिनिधींनी आव्हान केले आहे.
निवेदन पाठवण्याच्या कार्यवाहीसाठी, श्री. काशिनाथ हजारे, निलेश म्हसाडे, उत्तम कान्हुरकर, अभिजीत साकोरे, दादाभाऊ जैंद, ओंकार कान्हुरकर, मारुतराव गोरडे, प्रा. डॉ .बाळासाहेब माशेरे यांनी पाठपुरावा केला आहे.

