shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ता मेळावा, नवनियुक्त पदाधिका-यांचे नियुक्तीपत्र वाटप आणि आदर्श शिक्षकांना पुरस्कार कार्यक्रम संपन्न!*

*पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ता मेळावा, नवनियुक्त पदाधिका-यांचे नियुक्तीपत्र वाटप आणि आदर्श शिक्षकांना पुरस्कार कार्यक्रम संपन्न!*
इंदापूर प्रतिनिधी: पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे कार्यकर्ता मेळावा, नवनियुक्त पदाधिका-यांचे नियुक्तीपत्र वाटप आणि आदर्श शिक्षकांना पुरस्कार आदी कार्यक्रमाचे (ता.९)आयोजन करण्यात आले होते.
 या कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष  सुनिल तटकरे  यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा  रुपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष  सुरज चव्हाण यांच्यासह प्रदेश स्तरावरील, जिल्हा स्तरावरील व तालुका स्तरावरील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
कमी काळात ठरलेल्या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रमुख  अजितदादा पवार यांच्यावरील प्रेम दाखविल्याबद्दल पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी
सर्वांचे धन्यवाद मानले.
close