shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खेड तालुका "रयत क्रांती" संघटनेच्या वतीने ३ सप्टेंबर शेतकरी संघटनेचे संस्थापक/शेतकऱ्यांचे कैवारी स्वर्गीय शरद जोशी साहेब यांची ८९ वी जयंती काळुस येथे संपन्न..

खेड :-
रविवार दि. 3 सप्टेंबर २०२३ रोजी काळुस ता.खेड जि.पुणे येथे" रयत क्रांती शेतकरी" संघटनेच्या कार्यालयात सकाळी ११:०० वाजता स्वर्गीय शरद जोशी साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

    स्वर्गीय शरद जोशी यांनी शेतकऱ्यांना संघटित करून शेतकरी संघटनेची स्थापना केली. चाकण या ठिकाणी कांदा आंदोलनाचा प्रश्न सर्वप्रथम त्यांनी हाती घेतला आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात, भारतात शेतकरी संघटनेचा विस्तार करण्यात आला.
       स्वतः उच्चशिक्षित असून चांगल्या नोकरीचा त्याग करून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आयुष्य स्वर्गीय शरद जोशी यांनी व्यथीत केले. चाकण ही त्यांची कर्मभूमी मानली जाते.  आंबेठाण या ठिकाणी "अंगार मळा" हे त्यांच्या   शेतकरी चळवळीचे केंद्र बनलेहोते.  शेतकरीसंघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी अहोरात्र झटून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम स्वर्गीय शरद जोशी यांनी केले.
        शरद जोशी यांच्या "जयंतीनिमित्त"काळुस या ठिकाणी  "रयत क्रांती" संघटनेचे पदाधिकारी, पंचक्रोशीतील शेतकरी, ग्रामस्थ, महिला, तरुण, मोठ्या संख्येने जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.
     या कार्यक्रमाचे प्रास्ताविक: रयत क्रांती शेतकरी संघटनेचे खेड तालुका अध्यक्ष सुभाष पवळे यांनी केले. त्यांनी स्वर्गीय शरद जोशी यांचा जीवनपटा विषयी/ शेतकरीचळवळीविषयी सखोल माहिती उपस्थिताना दिली.  त्यांचा वसा आणि वारसा पुढे आपण सर्व चालू असा मनोदय त्यानीव्यक्त केला.
      शरदजोशीजयंती कार्यक्रम प्रसंगी  मा. नवनाथ आरगडे, विश्वासराव पोटवडे, विठ्ठलशेट अरगडे ,प्रा.डॉ. बाळासाहेब माशेरे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.    
        कार्यक्रमासाठी रयत क्रांती संघटनेचे गजानन गांडेकर, सुभाष पवळे, विठ्ठलशेठ आरगडे, विश्वास पोटवडे, नवनाथ आरगडे, बाळासाहेब खलाटे, परशुराम खैरे, मिनीनाथ साळुंखे,भरतभाऊ आरगडे, सुनीलभाऊ पोटवडे, सौ. सुवर्णा पठारे, बाळासाहेब दौंडकर, नवनाथ जाधव, सुरेश कौटकर, नितीन दौंडकर,  संजय कदम, पाटीलबुवा आरगडे, बाळासाहेब गांडेकर, प्रा.डॉ. बाळासाहेब माशेरे यांच्यासह अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   कार्यक्रमाचे आभार: श्री.सुनील पोटवडे यांनी मानले.
    कार्यक्रमाची सांगता: "पसायदानाने"करण्यात आली.
close