वीज टंचाई दुर करण्यासाठी भोकर सबस्टेशनची क्षमता वाढविण्याची भोकरच्या ग्रामसभेत मागणी
भोकर प्रतिनिधी:
सध्या पावसाने दडी मारल्याने सर्वत्र पाणी टंचाई भासत असल्याने पाटपाणी शेती बरोबरच पिण्यासाठी ही महत्वाचे असल्याने शेती बरोबरच गावतळे, बंधारे, पाझर तलाव भरणे आवश्यक असल्याने सध्या सुरू असलेल्या आवर्तनातून गावतळे, बंधारे, टेलटँक भरून द्यावेत अशा मागणीचा ठराव अशोकचे उपाध्यक्ष पुंजाहरी शिंदे यांनी मांडला त्यास सर्वांनी एकमुखी संमती दिल्याने तळ्यात पाणी सोडा अशी मागणी भोकर ग्रामस्थांनी केली. विविध विषयांवर साधक बाधक चर्चा करत हि ग्रामसभा शांततेत संपन्न झाली.
भोकर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेस नियोजीत दिवशी प्रशासकीय सरपंच अनुपस्थीत असल्याने स्थगीत झाल्यानंतर काल दुसर्या दिवशी संपन्न झालेल्या ग्रामसभेत प्रमुख उपस्थीतीत ते बोलत होते. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी प्रशासकीय सरपंच असलेले तालुका कृषी अधिकारी अजीतानंद पावसे हे होते. ग्रामविकास अधिकारी प्रदिप ढुमणे, कृषी सहाय्यक रूपाली काळे, पशु वैद्यकीय अधिकारी दिलीप कोकणे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष भाऊराव सुडके, संघटक सतीष शेळके, माजी उपसरपंच महेश पटारे, राजेंद्र चौधरी,सागर शिंदे व गणेश कांबळे हे प्रमुख मान्यवर उपस्थीत होते.
सध्या पावसाने दडी मारल्याने सर्वत्र पाणी टंचाई असल्याने पिण्याच्या पाणी साठवण्याची गरज असल्याचे राज्य सरकारने घोषीत केलेले असतानाही पाटबंधारे विभाग जिल्हाधिकार्यांकडून परवानगी नसल्याचे कारण सांगत गावतळ्यात, साठवण बंधार्यात पाणी सोडण्यास नकार देत असल्याने या ग्रामसभेने साठवण तलाव, बंधारे, गावतळे, व टेलटँक मध्ये पाणी सोडणे आवश्यक असल्याचा ठराव पुंजाहरी शिंदे यांनी मांडला त्यास उपस्थीतांनी संमती दर्शवत पाणी सोडण्याची एकमुखी मागणी केली.
तसेच सबस्टेशनमधून लगतच्या अनेक गावांना वीज पुरवठा केला जातो, येथे प्रत्येकी पाच एम व्ही ए क्षमतेचे तीन ट्रान्सफार्मर असताना ही अनेकदा भारनियमण होत आहे, त्यात अनेकदा अतिभारामुळे ट्रान्सफार्मर ब्रेकडावून होत असल्याने येथील क्षमता वाढविण्यासाठी पाच एम व्ही ए चे आणखी दोन ट्रान्सफार्मर वाढविण्याची गरज असल्याचा ठराव ही यावेळी पुंजाहरी शिंदे यांनी मांडला त्यास सर्वानुमते दुजोरा देत हा ठराव ही संमत करत या सबस्टेशनची क्षमता वाढविण्याची एकमुखी मागणी करण्यात आली.
शासनाकडून भारत मिशन अंतर्गत ५३ लाख रूपये खर्चाचा बायोफिल्टर प्लँट मंजूर झाला असल्याचे ग्रामविकास प्रदिप ढुमणे यांनी सांगीतले त्यास अशोकचे उपाध्यक्ष पुंजाहरी शिंदे, माजी उपसरपंच महेश पटारे व भाजपाचे तालुका उपाध्यक्ष यांनी तीव्र विरोध करत या प्लँटला नाकारले. याच वेळी भाजपाचे तालुका संघटक सतीष शेळके यांनी जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाच कोटी खर्चाच्या कामास मंजरी मिळून नऊ महिने उलटले तरी गावात पाणी येईना हिच योजना खाजगी व्यक्तीची असती तर तीन दिवसांत काम पुर्ण झाले असते परंतू संबधीत ठेकेदाराचे दिरंगाई मुळे गावात कृत्रीम पाणी टंचाई भासविली जात आहे. नऊ महिण्यात पाण्याच्या टाकीचे भुमीपुजनही नाही. संबधीत ठेकेदाराला काम होत नसल्यास ठेकेदार बदला पण गावाला पाणी द्या अशी मागणी करत संबधीत कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच प्रशासकीय सरपंच वेळेवर उपलब्ध नसल्याची तक्रार यावेळी शेळके यांनी केली.
त्यावर प्रशासकीय सरपंच अजीतानंद पावसे यांनी संबधीत ठेकेदारास येत्या दहा दिवसांत काम पुर्ण करा अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला. त्याच बरोबर माझे कडे तालुक्याचे कृषी विभागाचे काम आहे, सध्या दुष्काळी परीस्थीती व शेतीच्या कामांचा सिझन असल्याने पुर्ण वेळ ग्रामपंचायतीत उपलब्ध होणे शक्य नाही तरी ही माझे शिवाय कुठलेही कामाची अडचण होणार नाही याची दक्षता घेत असल्याचा खुलासा पावसे यांनी केला.
पेयजल योजनेतून जे हुकत असतील त्यांचेसाठी वाढीव पाणी पुरवठा योजनेस मंजूरी देण्याची मागणी करत तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी माजी उपसरपंच महेश पटारे यांनी केली. शेती बरोबरच गावच्या परीसरातील इतर उद्भव भरून देण्याची मागणी यावेळी पटारे यांनी केली. तर नव्याने टेलटँकहुन येणारे पाणी स्मशानभुमीजवळील तीन लाख रूपये खर्चाच्या नव्या विहीरीत टाकून तेथेन गावाला पाणी पुरवठा करण्याची मागणी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष भाऊराव सुडके यांनी केली. पाणी पुरवठ्याच्या मुख्यवाहीनीला कनेक्शन घेवू नका अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा यावेळी ग्रामविकास अधिकार्याने दिला.
यावेळी शासनाकडून वेळोवेळी अतिक्रमीत जागा धारकांवर कारवाईचा नोटीस बजावल्या जात आहेत, आमच्या अनेक पिढ्या या जागेत गेल्या तरी ही आम्ही अतीक्रमीत कसे? गायरान, खळे हे आमचेच आहे, तेव्हा त्यावर नोटीसा देवून आम्हाला मानसिक त्रास देवू नका, या जागा आम्ही सोडणार नसल्याचे यावेळी या भागातील अनेक रहीवाशी ग्रामस्थांनी सांगीतले. इंदिरानगर भागात साठवण टाकीची मागणी एकलव्यचे प्रकाश आहेर यांनी मांडली.
पशु वैद्यकीय अधिकारी दिलीप कोकणे यांनी लम्पीविरोधी लसीकरणा बरोबरच जनावरांची घ्यावयाची काळजीसह इतर माहीती विषद केली तर कृषी सहाय्यक रूपाली काळे यांनी कृषी विषयक विविध योजनाची माहीती दिली. कृषी अधिकारी पावसे यांनी शेतकर्यांची बियाणात फसवणुक झाली असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले. किसन शेटे यांनी वडजाई जिप शाळेसाठी स्वच्छता गृहाची मागणी केली तर आदिवासी स्मशानभुमीसाठीच्या वनीकरणातील जागेस ग्रामसभेत पुन्हा एकदा मंजूरी देण्यात आली परंतू जिल्हा परीषदेकडून इतर विभागाच्या ना हरकत मागविल्या असल्याने हा प्रश्न अद्याप ही प्रलंबीत असल्याचे ढुमणे यांनी सांगीतले.
यावेळी दिलीप मांजरे, एकलव्यचे सर्जेराव आहेर, प्रकाश आहेर, आबा काळे, अशोक डूकरे, मनिष शिंदे, भास्कर गायकवाड, तुकाराम बिरदौडे, निवृत्ती पटारे, चांगदेव पटारे, बबन आहेर, भानुदास बेरड, सुकदेव वाकडे, काळू डूकरे, अशोक शिंदे, मोहन पांढरे, दिपक शेळके, रविंद्र मते, ज्ञानेश्वर शिंदे, नामदेव वाकडे, भास्कर डूकरे, कैलास मते, ज्ञानेश्वर काळे, मुस्तका पठाण, अशोक अमोलीक, सोमनाथ तागड आदिंसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थीत होते.
सहयोगी:
पत्रकार चंद्रकांत झुरंगे - भोकर
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111*

