मोर्शी:-
मोर्शी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रमोद पोतदार सर यांनी त्यांच्या यशस्वी कारकिर्दीत आरोग्य सेवा ही वंचित, शोषित,उपेक्षित घटकापर्यंत पोहचविण्याचे कार्य खूप चांगल्या पद्धतीने केले आहे. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून त्यांनी वरुड ग्रामीण रुग्णालय हा एक आदर्श दवाखाना केला आहे. त्यांनी एक मॉडेल प्रस्तुत केला आहे व त्यात येणाऱ्या सर्व रुग्णांना त्यांचे समाधान करून पाठविण्याचे कार्य त्यांनी आजपर्यंत केले आहे.
त्याचपद्धतीने त्यांनी मोर्शी उपजिल्हा रुग्णालयाचा कायापालट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी रुग्णालयात अत्याधुनिक तंत्रज्ञान व उपकरणाचा समावेश करून रुग्णांना तत्पर व विशेष सेवा देण्याचे कार्य सुरू केले आहे. त्यांनी त्यांच्या नेतृत्वात आपल्या टीमला सोबत घेऊन गर्भपिशवी शस्त्रक्रिया, स्त्री सीझर शस्त्रक्रिया, हायड्रोसिल शस्त्रक्रिया, हर्निया शस्त्रक्रिया, कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया, गाठीच्या शस्त्रक्रिया, व इतर अश्या अनेक शस्त्रक्रिया करून राज्यामध्ये आदर्श रुग्णालय निर्माण केले आहे. त्याचबरोबर रुग्णालयात अंतर्गत स्वछता व परिसर स्वच्छता यावर सरांचे विशेष लक्ष असते. त्यांनी मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात विविध प्रकारची वृक्ष लागवड केली आहे.
डॉ.प्रमोद पोतदार सर हे ध्येयाने प्रेरित होऊन टीमवर्क करतात हे त्यांच्या यशाचे गमक आहे. सरांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन आजपर्यंत विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे नुकताच त्यांना महाराष्ट्र सरकारने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्काराने मा.मुख्यमंत्री व मा.आरोग्यमंत्री यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. सरांचे कार्यच तेवढे महान आहे. रक्तदान शिबिरे आयोजित करून त्यांनी अनेक लोकांना जीवनदान देण्याचे कार्य या माध्यमातून केले आहे. अमरावती जिल्ह्यातील व परिसरातील रुग्ण सरांकडे येऊन औषधोपचार घेऊन समाधानाने जातात यातच त्यांच्या कार्याचे यश आहे.
"नेतृत्व आसल्याशिवाय कर्तृत्व घडत नसतं" त्यांच्या या कार्यकर्तृत्वाला नेतृत्वाला सलाम आहे.आम्ही उपजिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचारी त्यांच्या या कार्याने खूप प्रोत्साहित झालो आहोत व जास्तीतजास्त रुग्णांना सेवा कशी देता येईल यासाठी सरांच्या नेतृत्वाखाली प्रयत्नशील असतो.
किस्मत मे लिखी हर मुश्कील टल जाती है, यदी हो बुलंद हौसले तो मंजिल मिल ही जाती है, सिर उठा कर यदि आसमान को देखोगे बार बार, तो गगन को छूने की प्रेरणा मिल ही जाती है.
असे हे आमचे प्रेरणास्थान डॉ.प्रमोद पोतदार सर आम्हां सर्व कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आपुलकी आहे. हा लेख लिहीत असताना त्यांच्या कार्याबद्दल शब्द कमी पडतील इतके त्यांचे कार्य मोठे आहे त्यांच्या या रुग्णसेवेला व कार्याला आमच्या खूप खूप शुभेच्छा.......
आपलाच
विनय शेलुरे
आरोग्य कर्मचारी उपजिल्हा रुग्णालय मोर्शी

