shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुका कुस्ती स्पर्धेत राधिका माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश .

इंदापूर तालुका कुस्ती स्पर्धेत राधिका माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत  यश .
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुका कुस्ती स्पर्धेत राधिका माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी  यश संपादन केले असून यामध्ये 14 वर्ष मुले *पै.कार्तिक लावंड 35किलो प्रथम क्रमांक*, *पै. राजवर्धन शेंडगे 35 किलो द्वितीय क्रमांक* , *पै. माऊली कचरे 57किलो प्रथम क्रमांक*17 वर्ष मुले पै . विश्वजीत  मदने 71 वजन गट प्रथम क्रमांक* यशस्वी खेळाडूंचे राधिका माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष तथा इंदापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष  अरविंद  वाघ यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.  
कुस्ती खेळाडूंना मार्गदर्शन करणारे राधिका विद्यालयाचे क्रीडा शिक्षक व राष्ट्रीय कुस्ती पंच  शरद झोळ सर यांचाही अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
या सर्व विजय खेळाडूंची पुणे जिल्हा स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे. राधिका माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय दडस सर यांनी  सर्व यशस्वी खेळाडू आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
close