shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

करमाळा बाजार समितीत जगताप गटाच्या दोन व सावंत गटाची एक जागा बिनविरोध

१८ जागांसाठी १६१ अर्ज दाखल

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप 

करमाळा: दि. ९/ करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जगताप गटाचे दोन व सावंत गटाचे एक संचालक बिनविरोध झाले आहेत. याची फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे. व्यापारी मतदार संघात दोन जागांसाठी दोन व हमाल- तोलार गटात एका जागेसाठी दोन अर्ज आले आहेत. ते एकाच उमेदवाराचे आहेत.

 अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी  (शुक्रवारी) तीन वाजेपर्यंत १८ जागांसाठी १६१ अर्ज दाखल झाले आहेत. जगताप, पाटील, बागल व शिंदे या चारही प्रमुख गटांच्या कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केले असल्याने ही निवडणूक कशी होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी माजी आमदार जयवंतराव जगताप, बागल गटाचे दिग्विजय बागल, उपसभापती चिंतामणी जगताप, माजी आमदार नारायण पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील, सभापती प्रा. शिवाजी बंडगर, शिंदे गटाचे समर्थक सुजित बागल, चंद्रकांत सरडे, मोहिते पाटील समर्थक डॉ. अमोल घाडगे, भाजपचे दीपक चव्हाण, अमरजित साळुंखे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रताप जगताप आदीनी अर्ज दाखल केले आहेत.
close