इंदापूरच्या जडणघडणीत सर्वधर्मीयांचे उत्सवात *' मानकरी 'असलेले- सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई यांचा सिंहाचा वाटा - महादेव चव्हाण सर
इंदापूर प्रतिनिधी : ९/९/१९६३ रोजी हमीदभाई नबीलाल आत्तार एका छोट्याशा मुस्लिम कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिराच्या शेजारीच त्यांचे घर आहे सिद्धेश्वराच्या नवसाचे हमीदभाई. आजोबा ,पंजोबा ,खापर पंजोबा पासून सहिष्णु वृत्तीचे असलेले कुटूंब . गणपती उत्सव, नवरात्र उत्सव, शिवजयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती, शाहू महाराज यांची जयंती. जोतिबाची यात्रा, शिखर शिंगणापूरची कावड यात्रा, थोर पुरुषांच्या जयंती उत्सव मध्ये भाग घेतात.
ह.चांदशावली बाबांचा उरूस, मोहरम ,बकरीईद, रमजान ईद, अशा विविध सण उत्सवामध्ये उत्साहाने भाग घेतात.
समाज भिमुख नेतृत्व गुण त्यांच्यामध्ये आहे. शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे अनेक उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो. ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी, कोपी वरची शाळा अभ्यास वर्ग, या मुलांना कपड्यापासून ते अन्नदान करण्याचे कार्य करत आहेत. हमीदभाई सामाजिक बांधिलकी ठेवूनच समाजाशी वागत असतात जाती धर्माचा लवलेशही त्यांच्या मनात सुध्दा कधीच नसतो सर्वधर्म समभाव हीच भावना त्यांच्या मनी आहे.
गोरगरिबांच्या अडचणी वेळी ते नेहमीच त्यांचे मदतीसाठी अग्रेसर राहतात. संघर्ष समितीचे ते मार्गदर्शक आहेत. घरपट्टी पाणीपट्टीवरील व्याज गोरगरिबाचे कमी झाले पाहिजे यासाठी ते गेली 160 दिवस लढा देत आहेत. गोरगरिबांचे अनेक प्रश्न त्यांनी सोडवले आहेत. घरकुलाचा प्रश्न जागेचा प्रश्न असे विविध प्रश्न त्यांनी सोडवले म्हणून त्यांना सामाजिक कार्यकर्ते ही पदवी समाजाने बहाल केली. लिनेस क्लबच्या चार्टर प्रेसिडेंट महिला दक्षता कमिटीच्या सायराभाभी ह्या त्यांच्या सुविद्ध पत्नी आहेत त्या सुध्दा खूप कष्टाळू आहेत गोरगरिबांचे प्रश्न कित्येक वर्ष ते सोडवतच आहेत कधीही त्यांच्यामध्ये नकारार्थी उत्तर त्यांच्याकडे नसते. पोलीस स्टेशन पासून ते घरापर्यंत असे सर्व प्रश्न हमीदभाई यांच्या मदतीने त्या सोडवत असतात. त्यांच्या दोन्ही मुली या इंजिनियर आहेत. त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात ते अजिबात बदल होऊ देत नाहीत. पैशापेक्षा माणसे जोडण्याचे काम या कुटुंबाने केले म्हणून इंदापूर शहरातील अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील , माजी पालकमंत्री आमदार दत्ता मामा भरणे . माजी नगराध्यक्ष स्मृती शेष रत्नाकरजी मखरे डॉ . सु.ना. कुलकर्णी. इ . अशा शहरातील मान्यवर व्यक्तीचे सोबत कार्याचा अनुभव व त्यांचे मिळालेले राजकिय , सामाजिक मार्गदर्शन .
मूर्ती छोटी पण कार्य महान हे हमीदभाई च्या रूपाने पहावयास मिळते.
आज त्यांचा वाढदिवस या वाढ दिवसानिमित्त हा मी त्यांच्या जीवनकार्याचा परिचय या लेखातून करून देत आहे. हमीद भाई आतार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
लेखक: महादेव चव्हाण सर

