shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महास्वयंम वेबपोर्टलवर येणाऱ्या अडचणींच्या सोडवणुकीसाठी हेल्पलाईन सुरु


अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा:  कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभागाच्या महास्वयंम (www.mahaswayam.gov.in) या वेबपोर्टलवर उमेदवारांना येणाऱ्या अडचणींसाठी मुख्यमंत्री हेल्पलाईन अंतर्गत हेल्पलाईन सुरु करण्यात आली असुन याचा लाभ घेण्याचे आवाहन  सहायक आयुक्त नि.ना. सुर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

उमेदवार,उदयोजक, नियोक्ते यांची नोंदणी करणे, नोंदणीचे अदययावतीकरण करणे, रिक्तपदे अधिसूचित करणे, रिक्तपदास अनुसरून ॲप्लाय करणे, जिल्ह्यातील युवक व विद्यार्थी यांना करिअर विषयक संधीची माहिती, रोजगार मेळावे व रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम यामध्ये इच्छुकता दर्शविणे, विविध प्रशिक्षण संस्था, स्टार्टअप इ. विविध ऑनलाईन सुविधा महास्वयंम या पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. या ऑनलाईन सेवा घेतांना लाभार्थी घटकांना येणा-या अडचणी, तक्रारींचे निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्री हेल्पलाईन अंतर्गत १८ ऑगस्ट, २०२३ पासून हेल्पलाईन सुरु करण्यात आलेली असुन याचा टोल फ्रि क्रमांक १८००१२०८०४० असा आहे. या हेल्पलाईनची वेळ स.८.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत अशी आहे.


संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -
9561174111
close