shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर येथे पर्यावरण पूरक गणपती सजावट.*

इंदापूर येथे पर्यावरण पूरक गणपती सजावट.*

श्री नरसिंह प्रसादिक गणेश उत्सव मित्र मंडळ यांचा अभिनव उपक्रम.
इंदापूर प्रतिनिधि: इंदापूर शहरातील मानाचा दुसरा गणपती *श्री नरसिंह प्रसादिक गणेश उत्सव मित्र मंडळ कासार पट्टा नामदेव मंदिर इंदापूर येथील मंडळाच्या  कार्यकर्त्यांनी एक ते दीड महिना अहोरात्र  परिश्रम घेत प्रदूषण मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणपती स्थापना ठिकाणी पर्यावरण पूरक असा नाविन्यपूर्ण इंदापूर शहरात प्रथमच बांबुचटई चा वापर करत मंदिरा मध्ये संपूर्ण सजावट केली आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पर्यावरणाला धोका होईल असे साहित्य वापरले गेले नाही. बांबू पासुन तयार केलेल्या चटई व बांबू चा वापर करत या ठिकाणी भव्य दिव्य असा सुंदर *बांबू महल* तयार करण्यात आलेला आहे. सदर मंडळाच्या तयार केलेल्या सजावटीचे सर्वत्र कौतुक होत आहे .त्याबरोबर नागरिकांमध्ये स्वच्छते बाबत  व वृक्ष संरक्षण व संवर्धनासाठी  जनजागृती व्हावी या उद्देशाने मी एक दे कर्मचारी बोलतोय व मी एक वृक्ष बोलतोय या मातळ्याखाली स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मनातील इंदापूर शहरतील स्वच्छते बाबत मनोगत तसेच वृक्ष संवर्धनासाठी वृक्षाचे मनोगत असे फ्लेक्सबोर्ड तयार करून नागरिकांचे निदर्शनास आणून दिले आहेत. सदर देखावा  पाहण्यासाठी शहरातील तसेच परिसरातील नागरिक गर्दी करत या सजावटीचे तोंड भरून कौतुक करत आहेत. मंडळाच्या वतीने येत्या चार पाच  दिवसात अजून सामाजिक, धार्मिक,  स्वच्छते संबंधी तसेच वृक्षारोपण  कार्यक्रम घेण्यात येणार आहेत तरी नागरिक बंधू-भगिनींनी या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची  मंडळाचे अध्यक्ष  अक्षय गानबोटे उपाध्यक्ष अमोल जठार* व सर्व मंडळाच्या सदस्य कार्यकर्त्यांनी विनंती केली आहे.
close