shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खडकपुरा गणेशमंडळाकडुन योगशिबीराचे आयोजन*

*खडकपुरा गणेशमंडळाकडुन योगशिबीराचे आयोजन*
इंदापूर प्रतिनिधि:छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ आयोजीत गणेशोत्सव  खडकपुरा येथे  युवकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृतिसाठी पहाटेच्या भक्तिमय ,प्रसन्न वातावरणात  योगशिबीराचे आयोजन केले होते.
आज समाजातील प्रत्येकाला काहीतरी शारीरिक, मानसिक व्याधी आहेत. या धावपळीच्या युगात स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळ मिळत नाही..पण निरोगी शरीर आणि निरोगी मन ही काळाची गरज आहे युवा पिढीला  याचे महत्व समजावे  म्हणुन छत्रपती शिवाजी महाराज गणेशोत्सव मंडळाच्या वतीने योगशिबीराचे आयोजन करीत स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

प्रारंभी मंडळाचे अध्यक्ष मा.नगरसेवक अमर गाडे,गणेश महाजन खजिनदार दादासाहेब पिसे ,शुभम धारुरकर पतंजलि योग समितीचे अध्यक्ष मल्हारी घाडगे,रविंद्र परबत सामाजीक कार्यकर्ते हमीद आतार यांचे हस्ते श्री.गणपतीची आरती आणि दिपप्रज्वलन करण्यात आले.

योगशिबारामध्ये पतंजलि युवा भारत राज्य कमिटी सदस्य प्रशांत गिड्डे,मिडीयाप्रभारी योगशिक्षक शरद झोळ यांनी वाॅर्म अप, सुर्यनमस्कार योगासने प्राणायमचे प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन केले..
    शिबीरासाठी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष,खजिनदार यांचेसह  कार्याध्यक्ष सतीश परदेशी,कुमार वाघमारे ,प्रतिक झोळ, धीरज वाघमारे, सौरभ वाघमारे, चैतन कांबळे,भूषण धारूरकर, सागर शेंदुरकर, संदीप वाघमारे, भारत वाघमारे,नागेश महाजन,अमोल वाघमारे  उपस्थित होते.
यावेळी  पतंजलि परीवातील बिभिषण खबाले, सुनिल कांबळे, भिमराव वणवे, महादेव चिंचकर ,देवराव मते,गणेश शिंदे,बाजीराव शिंदे,गौरव वाघ चंद्रकांत देवकर यांचा सन्मान करण्यात आला.
     शिबीराच्या समारोपप्रसंगी    मल्हारी घाडगे यांनी मनोगतामध्ये योगासने प्राणायम व्यायाम ही जीवनाची मुलभुत गरज असल्याचे सांगितले.दादासाहेब पिसे यांनी योग समितीला शुभेच्छा दिल्या..  तर अमर गाडे यांनी आभार व्यक्त केले..
close