shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुक्यात चारा छावण्यांचे नियोजन करावे - रासप युवक अध्यक्ष आकाश पवार.

इंदापूर तालुक्यात चारा छावण्यांचे नियोजन करावे - रासप युवक अध्यक्ष आकाश पवार.
इंडापुर प्रतिनिधि:गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्यात पावसाने म्हणावा तसा जोर धरलेला नाही. राज्यातील बहुतांश भागात ऑगस्ट महिना कोरडाच गेला आहे. इंदापूर तालुक्यात ही  जवळपास हीच परिस्थिती असून,पिके धोक्यात आली आहेत. परिणामी गुराढोरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने इंदापूर तालुक्यात चारा छावण्यांचे नियोजन करावे अशी मागणी रासपचे तालुका युवक अध्यक्ष आकाश पवार यांनी केली आहे. ते गुरुवारी (दि.१४) शासकीय विश्रामगृह याठिकाणी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सध्या रासप चा रस्ता मातीचा असला तरी स्वतःच्या अस्तित्वाचा आणि स्वाभिमानाचा आहे. आगामी काळातील निवडणुकांकरिता राष्ट्रीय समाज पक्ष युवकांची वज्र मूठ बांधून सक्षम पर्याय देणार आहे.असे म्हणत पवार यांनी शेती महामंडळाच्या कामगारांचा प्रश्न शासनाने तातडीने मार्गी लावावा अशीही मागणी केली आहे.

यावेळी सोन्या  जानकर उपाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष युवक आघाडी इंदापूर , राज  माने पाटील अध्यक्ष धनगर समाज विकास मंडळ , संतोष आरडे अध्यक्ष बहुजन क्रांती सेना , सुरज मारकड सदस्य राष्ट्रीय समाज पक्ष , विनोद  रुपनवर सदस्य राष्ट्रीय समाज पक्ष, गणेश कोकरे, खंडू सलगर व आदी उपस्थित होते.
close