shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो पण ज्ञान टिकवण्यासाठी वैराग्य असावे लागते. वैराग्य प्राप्तीसाठी भक्ती करावी लागते. असे मत ह.भ.प.जगदिश महाराज जोशी

कळस ( प्रतिनिधी ):- मानवाच्या जीवनात भक्ती, वैराग्य व ज्ञान या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो पण ज्ञान टिकवण्यासाठी वैराग्य असावे लागते. वैराग्य प्राप्तीसाठी भक्ती करावी लागते. असे मत ह.भ.प. जगदिश महाराज जोशी, त्रंबकेश्वर यांनी तृतीय कीर्तन पुष्प गुंफताना व्यक्त केले.

      भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग  ||
      ज्ञान ते ब्रम्ह भोग ||
या जगदगुरु तुकाराम महाराज यांचे अभंगावर निरूपण करताना जोशी महाराज अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या प.पू. सुभाष पुरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अकोले तालुक्यातील कळस बू येथे गणेश उत्सवात ऋषिपंचमी ते वामन जयंती या पावन पर्व काळात आयोजित अखंड हरिनाम सप्ताह तथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मध्ये बोलते होते.   

     श्री. जोशी महाराज म्हणाले की, युद्ध मध्ये अहिंसा घातक असते. मनुष्य जीवनाचा चांगला विचार वेद अन संत करतात. जीवन अभ्यंग अन बाह्यांग पवित्र असावे. जगतमान्य होण्यापेक्षा संत मान्य व्हावे. परमार्थ हा प्रसिद्धीचा विषय नाही.

      यावेळी हभप  मृदंगाचार्य ह.भ.प. संकेत महाराज आरोटे, गायकवृंद अरुण महाराज शिर्के, राजेंद्र महाराज सदगीर, मुकुंद बोऱ्हाडे, हार्मोनियम वादक सूर्यकांत ढगे , विणेकरी गंगा बाबा वाकचौरे हे उपस्थित होते.       
 ह.भ.प. गणेश महाराज वाकचौरे कळस यांनी प्रवचन सेवा केली. श्री. शरद विश्वनाथ वाकचौरे व जयकिसान दूध संस्थेचे उपाध्यक्ष  श्री. अशोक पुंजा वाकचौरे यांनी संतपंगत दिली.
close