श्री छत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालयात आनंद भोईटे यांचा वाढदिवस उत्सहात साजरा.
इंदापूर प्रतिनिधी : श्री.छत्रपती शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालयात बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक , कर्तबगार, कर्तव्यदक्ष, सामाजिक शैक्षणिक बांधिलकीची तळमळ आणि आवड असणारे सिंघम पोलिस अधिकारी अशी ओळख असणारे श्री आनंदजी भोईटे साहेब यांचा वाढदिवस प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे, उपप्रचार्य डॉ संजय मोरे, कार्यालयीन अधीक्षक सुशील निंबाळकर व सर्व प्राध्यापक प्राध्यापकेत्तर यांच्या उपस्थित केक कापून शाल, श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सन्मान सत्कार करून उत्साहात साजरा केला. भोईटे साहेबांना वाढदिवसाच्या उदंड आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी आनंद भोईटे साहेबांनी महाविद्यालयाच्या वतीने सन्मानपूर्वक वाढदिवस साजरा करून शुभेच्छा दिल्याबद्दल महाविद्यालयाचे आभार मानले.

