सरडेवाडीचा सुपुत्र अमित किसन शिताप यांची कर परीक्षासहायक ( टॅक्स असिस्टंट ) म्हणून झाली निवड.
इंदापूर तालुक्यातील विविध मान्यवरांनी केले अभिनंदन.
इंदापूर प्रतिनिधी: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्या कडून कर सहायक या पदा करीत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये अमित किसन शिताप यांची कर परीक्षासहायक ( टॅक्स असिस्टंट ) म्हणून निवड झाली म्हणून इंदापूर येथे विधी तज्ञ नितीन राजगुरू, सामाजिक कार्यकर्ते अमोल मुसळे यांनी अमित यांचा कर सहायक म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार केला व पुढील सेवा करण्यासाठी खूप शुभेच्छा दिल्या.
अमित शिताप याचे गाव सरडेवाडी तालुका इंदापूर येथील असून त्यांचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या कर सहायक पदासाठीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला या मध्ये अमित यांची कर सहायक म्हणून निवड झाली.
यावेळी विधीतज्ञ नितीन राजगुरू यांनी सांगितले की, अमित यांनी अतिशय कष्टातून आणि कोरोना सारख्या गंभीर आजारात देखील आपल्या अभ्यासावरती लक्ष केंद्रित करून हे यश संपादन केले आहे.
याप्रसंगी अमित शिताप मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, या यशामध्ये माझे आई वडील छोटा भाऊ यांचा सिहाचा वाट आहे आणि माझे गुरु तसेच मित्र मंडळी या सर्वांचे हे यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन, सहकार्य लाभले आहे.
यावेळी पत्रकार सुधाकर बोराटे, मनसे उपजिल्हा अध्यक्ष राजेंद्र हजारे, झगडेवाडी गावाचे माजी उपसरपंच बाळासाहेब झगडे, मनविसे तालुका अध्यक्ष राजू भोंग, काँग्रेस ओबीसी सेल अध्यक्ष बापूसाहेब बोराटे, माळी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष विकास शिंदे, मनसे शहर अध्यक्ष सुरेश व्यवहारे, सामाजिक कार्यकर्ते युवराज बन, संतोष राजगुरू, मोरे सर, किरण वाघ, संदीप परांडे, विशाल अभंग, इत्यादी उपस्थित होते .

