अवसरी येथे गणेश उत्सवानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन.
इंदापूर प्रतिनिधी: अवसरी (ता - इंदापूर)येथील शिवाजीनगर परिसरामध्ये जय शिवाजी तरुण मित्र मंडळ अवसरी यांच्या वतीने गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या गणेशोत्सवानिमित्त व सौरभ संजय जाधव यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त डॉ. रणजीत कोरटकर व डॉ. सौ. रुपाली कोरटकर यांच्या वतीने या परिसरातील लहान, थोर, वयोवृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी करून मोफत औषध उपचार करण्यात आले. डॉ. रणजीत कोरटकर व डॉ. रूपाली कोरटकर यांच्या या सामाजिक बांधिलकीचा अवसरी ग्रामस्थ व जय शिवाजी तरुण मित्र मंडळ यांच्या वतीने त्यांचे सन्मानपूर्वक आभार मानण्यात आले.
याप्रसंगी प्रकाश शिंदे, पै. सागर मारकड, सिद्धेश्वर थोरात, शांतीलाल शिंदे, हरिदास कवितके ,डॉ. गणेश पिंगळे व इतर मान्यवर, ग्रामस्थ, गणेश मित्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

