shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेवन्थ डे अडवेंटीस्ट स्कूलतर्फे क्रीडा महोत्सवाचे आयोजन


श्रीरामपूर प्रतिनिधी:
येथील सेवेंन्थ डे अडवेंटिस्ट स्कूल तर्फे येथील थत्ते ग्राउंडवर क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये धावणे, सॅक. रेस, रिलेरेस , स्लो सायकलिंग,कबड्डी, क्रिकेट इत्यादी खेळांचा समावेश असणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन इंजिनीयर श्री अविनाश काळे व वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष श्री चरण दादा त्रिभुवन यांनी केले. दिनांक १२ व १३ ऑक्टोबर या कालावधीत या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत.


स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्कूलचे मॅनेजर श्री प्रकाश साळवे सर, पास्टर साठे, सुपरवायझर रवीना पंडित, आणि स्कूल  स्टाफ प्रयत्नशील आहेत. स्पर्धा उद्घाटनाप्रसंगी विद्यार्थ्यांसमेत पालक , रेव्ह. साठे, पास्टर  त्रिभुवन, पास्टर चक्रनारायण, पास्टर गायकवाड,दीपक कदम उपस्थित होते.


सहयोगी:
पत्रकार दीपक कदम - श्रीरामपूर 
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close