जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये एन .ई.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर येथील 19 वर्षे वयोगटातील मुलींनी मिळविले उपविजेतेपद.
इंदापूर प्रतिनिधि: श्री छत्रपती संभाजी विद्यालय जातेगाव तालुका शिरूर या ठिकाणी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये एन .ई.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर (ता. इंदापूर जि. पुणे )येथील 19 वर्षे वयोगटातील मुलींनी उपविजेतेपद मिळविल्याबद्दल सर्व विजेत्या खेळाडूंचं, मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात आले .विशेषता सर्वच क्रीडा शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. सर्व खेळाडूंना यशस्वी करण्यासाठी सर्वच मार्गदर्शक शिक्षकांनी उत्तम प्रकारचे परिश्रम घेऊन जिल्हा स्तरावरती आपल्या विद्यालयाचा व कनिष्ठ महाविद्यालयाचा बहुमान उंचावला, नावलौकिक वाढवला. ही खरोखरच सर्वच संस्था विद्यालय व कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची बाब आहे . शालेय गुणवत्ता वाढी बरोबरच विद्यार्थ्यांचा बौद्धिक मानसिक व शारीरिक विकास होणं या अत्यंत काळाची गरज आहे. अलीकडील काळामध्ये आपल्या विद्यालयाने खेळाच्या बाबतीत देखील खूप उत्तम प्रकारची कामगिरी दाखवली आहे. खेळाडूंचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आपल्या विद्यालयातील क्रीडाशिक्षक वैभव हणमंते, प्रमोद चव्हाण, सिकंदर मुलानी, दत्तात्रय ढोबळे, सौ सोनाली शेंडे मॅडम यांनी विशेष प्रयत्न केले. या सर्वांचे मनःपूर्वक. कौतुक. नक्कीच आगामी काळामध्ये आपले विद्यालय सर्वांगीण विकासाच्या बाबतीत पुढे गेल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास संस्थेचे सचिव धनंजय रणवरे यांनी व्यक्त केला. या सर्वच खेळाडूंच्या यशामध्ये नामवंत क्रीडा शिक्षक व विद्यमान प्राचार्य चंद्रकांत गोपाळराव रणवरे यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे व सर्व क्रीडा शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन व कौतुक केले. कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर चे कुशल विभागप्रमुख चंद्रकांत बलभीम बोंद्रे, यांनी देखील सर्व यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक मधुकर शंकर खरात यांनी सर्वांचे अभिनंदन केले. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र रणवरे, उपाध्यक्ष संजय रणवरे उर्फ पप्पू पाटील, यशवंत विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन नंदकुमार रणवरे यांनी सर्व खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व सर्वांनाच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.