भोरवाडी:-
भोरवाडी गावातील दीपक रंगनाथ भोर वउत्तम नामदेव भोर यांच्यावर वीज चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 16 /10 /2023 रोजी शाखा अभियंता संदीप विठ्ठल बराट व त्यांच्या पथकाने टाकलेल्या धाडीमध्ये भोरवाडी गावातील दीपक रंगनाथ भोर यांच्या पोल्ट्री शेड ची विज जोडणी तपासले असता त्यांनी मिटर ला येणाऱ्या सर्व्हिस केबल व्यतिरिक्त अधिकची काळ्या रंगाची केबल टाकून अनाधिकृत वीज पुरवठा घेतल्याचे दिसले. त्यांनी त्यांच्या शेड साठी मागील नऊ महिन्यात महावितरण कंपनीची 7834 युनिट ची वीज चोरी केली आहे, त्याची किंमत 98 हजार 123 व कलम 152 प्रमाणे तडजोड रक्कम 18000 अशी एकूण 1 लाख 16 हजार 123 इतक्या किमतीची वीज चोरी केली असल्याचे गुन्ह्यात म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या मुदतीत दंड भरल्यामुळे त्यांच्यावर काल संध्याकाळी वीज चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला.16 ऑक्टोबर रोजी तिथपासूनच दूर असलेल्या उत्तम नामदेव भोर यांच्या घरची वीज जोडणी तपासली असता त्यांनी त्यांच्या घरापासून जवळ असलेल्या महावितरण लाईनवर फेज व न्यूट्रल ला आकडा टाकून काळ्या रंगाच्या केबल द्वारे अनाधिकृत वीज पुरवठा घेतल्याचे आढळून आले.
त्यांनी मागील एक वर्षात महावितरण कंपनीची 957 युनिट ची विज चोरी केली असून त्याची किंमत 15 हजार 131 व कलम 152 प्रमाणे तडजोडीची रक्कम चार हजार अशी 19 हजार 131 इतक्या रकमेची वीज चोरी केलेली आहे त्यांनी विहित मुदतीत दंड न भरल्यामुळे त्यांच्यावर काल संध्याकाळी वीज चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला दोन्हीही गुन्ह्याचा तपास इन्स्पेक्टर शिरीष कुमार देशमुख करत आहेत.

