मराठा आरक्षणासाठी वडापूरीत कॅण्डल मार्च.
आरक्षण मिळावे म्हणून मराठा बांधवांनी केल्या तीव्र भावना व्यक्त.
इंदापूर प्रतिनिधि: इंदापूर तालुक्यातील वडापूरी येथे सकल मराठा समाज वडापूरी व पंचक्रोशी यांच्या वतीने दिंनाक २५ ऑक्टोंबर २०२३ रोजी पासून मराठा आरक्षणसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठींबा म्हणुन साखळी उपोषण सुरू (दि. २९ ऑक्टो) रोजी कॅण्डल मार्च कडण्यात आला. यामध्ये मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या मार्च मध्ये जय भवानी जय शिवराय,एक मराठा लाख मराठा,आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, जरांगे पाटील तुम आगे बडो, हम तुम्हारे साथ है. अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यामध्ये लहान थोर मुले, मुली, महिला व पुरुष यांचा समावेश दिसून आला. संपूर्ण गावातून कॅण्डल मार्च काढल्यानंतर या मार्च चे रूपांतर सभेमध्ये झाले मराठा बांधव आणि महिला भगिनींनी अतिशय तीव्र शब्दात मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत आरक्षण मिळावे म्हणून आपल्या भावना व्यक्त केल्या.

