shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीनाथ विद्यालय वडापुरी येथे लोकसहभागातील निधीतून संरक्षण भिंतीच्या कामाचा शुभारंभ.


श्रीनाथ विद्यालय वडापुरी येथे लोकसहभागातील निधीतून  संरक्षण भिंतीच्या  कामाचा शुभारंभ.
फोटो ओळ: श्री नाथ विद्यालय वडापुरी येथे लोकसहभागातील निधीतून  संरक्षण भिंतीच्या  कामाचा शुभारंभ प्रसंगी सर्व मान्यवर.

इंदापूर प्रतिनिधि: वडापुरी (ता. इंदापूर) येथील श्रीनाथ विद्यालय वडापुरी या विद्यालयामध्ये लोक सहभागातून उभारलेल्या निधी मधून संरक्षण भिंतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करून कामास सुरुवात करण्यात आली. 
या कामाचा शुभारंभ युवा उद्योजक आशिष बर्गे व त्यांच्या पत्नी सौ शितल बर्गे यांच्या हस्ते व संस्थेचे अध्यक्ष प्र .के.बागल, संचालक दत्तात्रय शिर्के, जनार्दन देवकर, निवृत्ती शिर्के, तसेच भागवत काटकर ,तय्यब शेख, शिवाजी तरंगे, अमर नलवडे, सुभाष पिंगळे, सोपान शेलार, बाबुराव शिर्के, चौरे सर व मुख्याध्यापक शहाजी तपासे, सहशिक्षक   पासगे सर, खताळ सर, सिंगाडे सर, सौ  शिर्के मॅडम,
सौ पवार मॅडम, सौ.थोरात मॅडम, सौ घोडके मॅडम,  शिर्के सर आणि समीर मदने यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ अर्चना शिर्के मॅडम यांनी मानले.

close