shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रिपब्लिकन पार्टी आँफ इंडीया (आठवले गट) मराठा आरक्षण उषोणास पाठींबा"

"
नाशिक - ओझर मीग प्रतिनिधी:
मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांचे राज्यभर सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलन व उपोषणास ओझर (मिग) येथील मराठा समाज बांधवांनी एकदिवसीय उपोषणासास रिपब्लिकन पार्टी आँफ इंडीया (आठवले) पक्षाच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यासाठी रिपाईचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा जिल्हाप्रमुख प्रकाश लोंढे, राज्य उपाध्यक्ष रविंद्रदादा जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनोद जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष  संजयबाबा गायकवाड,अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष वसंतराव वाघ, युवक जि.उपाअध्यक्ष अजय शेजुळ, जिल्हा संघटक कांचनराज जाधव, आदींनी भेट देऊन पाठींबा जाहीर केला. 

या प्रसंगी प्रकाश लोंढे यांनी पक्षाची भुमिका व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मा.ना.रामदास आठवले यांनी सर्वप्रथम मराठा आरक्षण मिळावे म्हणून पहीली मागणी केली आमच्या पक्षाचा मराठा आरक्षणास सुरुवातीपासून पाठींबा असल्याचे मत व्यक्त केले. या उपोषणास कामगार नेते शामराव कदमराव, अशोक कदम, शिवसेना शहरप्रमुख नितीन काळे, पप्पु खोतकर, सुरेश कदम, दौलत देवकर, दिनकर कदम, कार्तिक कोतवाल, आदींसह असंख्य मराठा बांधव उपोषणात सहभागी होते.


पत्रकार वजीरभाई शेख -पाथर्डी
सहयोगी:स्वाभिमानी संपादक सेवा संघ
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close