shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जगदंबा माता मंदिर व देवस्थान हीच भोकर गावची ओळख - आरतीताई शिंदे महाराज


*भोकर येथील गाथा पारायण व किर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

चंद्रकांत झुरंगे - भोकर
प्रत्येक गावाची ओळख ही तेथील मंदिर व देवस्थानावर अवलंबून असते. मंदिर कीती मोठे त्यापेक्षा तेथे देवत्व कीती आहे हे महत्वाचे असते. जेथे नित्य नियमाने पुजा होते, ज्या मंदिरात पावित्र्य सांभाळले जाते तेथे देवत्व असते. त्याप्रमाणे भोकर येथील जगदंबा माता मंदिर व देवस्थानातील पावित्र्य महान असल्याने हे देवस्थान प्रत्येकाला आपलेच वाटते. म्हणूनच भोकर गावची ओळख हि जगदंबा मातेचे भोकर म्हणून ओळख आहे असे प्रतिपादन श्रीक्षेत्र भोकर येथील भागवताचार्य आरतीताई शिंदे महाराज यांनी व्यक्त केले.  

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे शारदीय नवरात्रौ निमीत्ताने आयोजीत गाथा पारायण व जाहीर किर्तन महोत्सवात सांगते प्रसंगी काल्याचे किर्तनातून उपस्थीतांना उपदेश करताना त्या बोलत होत्या. यावेळी येथील व्यापिठ चालक भागवताचार्य संतोष महाराज पटारे, सुदाम महाराज चौधरी, निवृत्ती महाराज विधाटे, प्रसाद महाराज गायकवाड, लक्ष्मण महाराज नांगरे, किरण महाराज हराळे, गणेशखिंड देवस्थानचे सचीव बजरंग दरंदले, सोसायटीचे अध्यक्ष गणेश छल्लारे, ठकसेन खंडागळे, गंगाराम गायकवाड, भाजपा तालुका उपाध्यक्ष भाऊराव सुडके, तालुका संघटक सतीष शेळके, सोसायटीचे सचीव सिताराम कर्जुले व जगन्नाथ नरसाळे, संतोष मते आदि व्यापिठावर उपस्थीत होते.  
कुठल्याही सप्ताहाची परीपुर्णता म्हणजेच काला होय. काल्याचे किर्तनाने पाप नष्ट होते. समाज जिंकायचा असेल तर शुद्ध व गोड वाणी असली पाहीजे तर देवाला जिंकायचा असेल तर शुद्ध भाव असला पाहीजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला घालून दिलेले आदर्श व संस्कार विसरू नका, आपण छत्रपतींचे मावळे आहोत, तेव्हा आपण बाया नाचविणारे नाही तर बाया वाचविणारे मावळे झालो तरच छत्रपतींना समाधान लाभणार आहे.
भगवंताच्या दारात सर्वजण सारखे असतात येथे कुणीही मोठा नसतो तर कुणीही लहान नसतो आपण सर्वजण त्या परमेश्वराची लेकरं आहोत हे विसरू नका. कुठलेही अध्यात्मीक कार्य असो आपण राजकीय पार्ट्या, पक्ष, गट विसरून कथा, किर्तन व पारायणाला एकत्र आले पाहीजे. आपल्याला जेव्हढं चांगलं करता येईल तेव्हढं चांगल केले पाहीजे म्हणजे आपलं हि चांगलंच होत असतं. भोकर गावात असलेल्या मान्यवर महाराज व भजनी मंडळामुळे गावातील पावित्र अबाधित आहे त्याच बरोबर अध्यात्म ही टिकून आहे त्याचा लाभ घेवून आपलं जीवन सफल करा असे आवाहन यावेळी आरतीताई शिंदे महाराज यांनी सांगीतले.
सालाबाद प्रमाणे यावर्षीही सप्ताहचे आरंभी अशोक कारखाण्याचे उपाध्यक्ष पुंजाहरी शिंदे व माजी उपसरपंच महेश पटारे यांचे मार्गदर्शनाखाली भाऊराव सुडके यांचे नेतृत्वात येथील युवकांनी श्रीक्षेत्र माहुरगड येथून प्रज्वलीत केलेली ज्योतीचे भोकर येथे आगमन झाले त्यावेळी गावात ठिकठिकाणी चौकाचौकात या ज्योतीचे व युवकांचे स्वागत करण्यात आले. त्या प्रज्वलीत ज्योतीने भोकर येथील रेणुकामाता देवस्थान येथील ज्योत प्रज्वलीत करून येथील शारदीय नवरात्रौ उत्सव सोहळ्याचा शुभारंभ झाला. या सप्ताह काळात श्रीक्षेत्र देवगडचे महंत गुरूवर्य भास्करगीरीजी महाराज व श्रीक्षेत्र भामाठाणचे महंत स्वामी अरूणनाथगीरीजी महाराज यांनी सदीच्छा भेट दिली.


येथे दररोज काकडा आरती, भजन, सकाळची महाआरती, सामुदायीक हनुमान चालीसा, शिवप्रतिष्ठाणच्या युवकांची दुर्गामाता दौड व विविध गीत गायण, त्यानंतर गाथा पारायण, दुपारी येथील स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मीक विकास केंद्रातील महिालांचा सामुदायीक ‘दुर्गाशप्तसदी पाठ’ त्यानंतर दुपारी महाराष्ट्रातील मान्यवर किर्तनकारांचे जाहीर हरीकिर्तन त्यानंतर गावातील मान्यवरांकडून खिचडी फराळ, सायंकाळी हरीपाठ या प्रमाणे मोठ्या उत्साहात येथील शारदीय नवरात्रौत्सव संपन्न झाला या काळात तीसर्‍या माळेपासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी सुरू झाली त्यात पाचव्या, सातव्या व नव्या माळेला उच्चांकी गर्दी झाली होती. दरम्यानच्या काळात काही युवकांनी ग्रुपने तर काही भक्तांनी अनेकदा केळी प्रसादाचे व पेढ्याचे वाटप करत या उत्साहात सहभाग नोंदविला. यावेळी येथील भाऊराव उर्फ लक्ष्मण सुडके, हनुमाण पांढरे, सुभाष आहेर, मुस्साभाई पठाण, रतन काळे सुनिल पटारे यांनी काल्याचे किर्तनानंतर महाप्रासादाचे अन्नदान केले.  
  या काल्याचे किर्तनास भारत छल्लारे, ज्ञानेश्वर काळे, मच्छींद्र काळे, मोहन पांढरे, पोपट वाकडे, बाबासाहेब बेरड, भाऊसाहेब विधाटे, कान्हु आहेर, माजी सरपंच पुनमताई पटारे, गयाबाई शेळके, लीलाबाई जाजू, कल्पना आसावा, शिल्पा न्हावले, आशाबाई झिने, बेबी पवार आदिंसह मोठा जनसुमदाय उपस्थीत होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आकाशवाणी निवेदक संतोष मते यांनी केले.
*छाया: भानुदास बेरड*

*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर
*सहयोगी: स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close