shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुका बार असोसिएशन यांच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास जाहीर पाठिंबा.

इंदापूर तालुका बार असोसिएशन यांच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास जाहीर पाठिंबा.

इंदापूर तहसील कार्यालय समोर सकल मराठा समाज इंदापूर यांच्यावतीने चालू असलेल्या कायदेशीर व सनदशीर आंदोलनास  जाहीर पाठिंबा


इंदापूर प्रतिनिधी:  दिनांक ३० ऑक्टोबर २०२४ रोजी इंदापूर तालुका बार असोसिएशन यांच्या वतीने इंदापूर तहसीलदार यांच्या नावे निवेदन पत्र देऊन  मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास जाहीर पाठिंबा असल्याचे पत्र देण्यात आले. यापूर्वी इंदापूर तहसील कार्यालय समोर चालू असलेल्या अमरण उपोषण या ठिकाणी सर्व बार असोसिएशन सदस्य यांनी भेट देऊन आरक्षण संदर्भातील आपल्या भावना व्यक्त केल्यावर निवेदन पत्र तेथील आमरण उपोषणास बसलेल्या मराठा बांधवांना देण्यात आले.



सदर दिलेल्या निवेदन पत्रात नमूद केली आहे की ,आम्ही इंदापूर वकील संघटनेचे सर्व सदस्य लेखी निवेदन द्वारे शासनाच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की ,संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे चाललेले मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील चाललेल्या आंदोलनास आमच्या इंदापूर वकील संघटनेचा जाहीर पाठिंबा असून सदर मराठा समाजास कायदेशीर रित्या टिकणारी आरक्षण शासनाने जाहीर करावे अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच इंदापूर तहसील कार्यालय समोर सकल मराठा समाज इंदापूर यांच्यावतीने चालू असलेल्या कायदेशीर व सनदशीर आंदोलनास आमचाही जाहीर पाठिंबा या निवेदनाद्वारे देण्यात येत आहे असे निवेदन पत्र बार असोसिएशन चे अध्यक्ष यांच्या सही व शिक्का असलेले निवेदन देण्यात आले. यावेळी इंदापूर तालुका बार असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close