निरवांगी येथे मराठा समाज बांधवांच्या वतीने साखळी उपोषणाला झाली सुरुवात .
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला दिला पाठिंबा.
इंदापूर प्रतिनिधि: इंदापूर तालुक्यातील निरा नदी किनारी वसलेले निरवांगी येथे समस्त सर्व मराठा समाज बांधव निरवांगी ता- इंदापूर जि- पुणे यांच्या वतीने अंतरवली सराटी येथे २६ ऑक्टोबर २०२३ रोजी पासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण चालू आहे. त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी समस्त सर्व मराठा समाज निरवांगी यांच्यावतीने दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ पासून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सर्व मराठा बांधवांनी घोषणा देत सर्व परिसर दणाणून सोडला. हे साखळी उपोषण रात्रंदिवस चालू राहणार आहे. यासंबंधीचे निवेदन पत्र इंदापूर तहसीलदार तसेच प्रांत अधिकारी व वालचंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे देण्यात आले आहे.

