इंदापूर प्रतिनिधि: वडापुरी गाव मध्ये नवरात्र उत्सव मोठ्या थाटामाटात भक्तीमय वातावरणात सरू असून गावातील ग्राम दैवत श्रीनाथ, श्री भैरवनाथ मंदिर , श्री महालक्ष्मीदेवी,मातंगी देवी, या ठिकाणी गावातील ग्रामस्थांच्या वतीने नवरात्रीच्या नऊ दिवसात अतिशय सात्विक भावनेने ग्रामस्त सकाळ, संध्याकाळ आरती करुन नवरात्र उत्सवाचा आनंद घेत आहेत. तसेच वडापुरी गावा मध्ये दुर्गादेवी श्री विठ्ठल मित्र मंडळ, दुर्गादेवी जय भवानी मित्र मंडळ, जय तुळजाभवानी मित्र मंडळ पवारवस्ती, दुर्गामाता जय भवानी मित्र मंडळ पिंगळेवस्ती, काळुबाई महालक्ष्मी, दुर्गामाता जय भवानी मित्र मंडळ पिंगळेवस्ती पवारवस्ती, यमाई देवी, धुळोबा भिवाई मंदीर करगळ -पिंगळेवस्ती,
यांच्या वतीने देवीची स्थापना करून रोज सकाळी संध्याकाळी मोठ्या संख्येने संख्येने भाविक एकत्र येत आरती केली जाते .
या नवरात्र उत्सवाची सुरुवात तुळजापूर वरून पायी मशाल पेटवून आणून देवीची घट स्थापना करण्यात आली. यानंतर नऊ दिवस आरती देवीची आराधना करणारी गाणी गायली जातात. एकोपा जपण्यासाठी दांडीया, संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा, नृत्य स्पर्धा, विवीध सांस्कृतिक स्पर्धा या मंडळांच्या वतीने संपन्न होतात.तसेच शेवटी होम करुन नवरात्र उत्सवाची सांगता करण्यात येते. काही ठिकाणी सुरुवातील तर काही ठिकाणी शेवटच्या दिवसी मिरवणूक काढण्यात येते.

